जगभरातील कंपन्यांसाठी (Companies) डोकेदुखी (headache) ठरलेल्या हॅकर्सची (hackers) हिंमत (daring) दिवसेंदिवस वाढतेच आहे. नुकतेच याचे एक ताजे उदाहरण (fresh example) समोर आले आहे. एका बातमीनुसार रशियाच्या (Russia) हॅकर्सच्या समूहाने (hackers group) टेक क्षेत्रातील (tech industry) दिग्गज कंपनी (giant company) असलेल्या अॅपलला (Apple) निशाण्यावर घेतले आहे. अॅपल कंपनी आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेबाबत (customers security) अतिशय गंभीर (serious) असते. अशात हॅकर्सनी (hackers) अॅपलकडून तब्बल 375 कोटी रुपयांची खंडणी (ransom) मागितली आहे. जाणून घ्या काय आहे हे संपूर्ण प्रकरण.
रशियाच्या या हॅकिंग समूहाचे नाव रेव्हिल असे आहे ज्यांनी एका पोस्टमध्ये असा दावा केला आहे की त्यांनी अॅपलच्या भविष्यातील उत्पादनांची माहिती लीक केली आहे. हा प्रकार अॅपलच्या स्प्रिगं लोडेड इव्हेंटच्या आधी झाला आहे. या समूहाचे म्हणणे आहे की हा डेटा मॅकबुक आणि इतर अॅपल उत्पादनांच्या उत्पादकांकडून मिळाला आहे.
सर्वात आधी हॅकर्सनी तैवानच्या क्वांटा या कंपनीला लक्ष्य केले होते. या डेटा लीकचा खुलासा ब्लूमबर्गनेही आपल्या बातमीत केला आहे. हॅकिंग ग्रुपने इथे आधी क्वांटाकडूनही पैसे उकळण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा त्यात त्यांना यश आले नाही तेव्हा त्यांनी टे क्षेत्रातील दिग्गज असलेल्या अॅपलला लक्ष्य केले. हॅकर्सनी हा सर्व खुलासा डार्क वेब पोर्टलवर मेसेजच्या माध्यमातून केला आहे. यासाठी त्यांनी 21 स्क्रीनशॉट अपलोड केले आहेत ज्यात अॅपलच्या काही आगामी उत्पादनांचेही फोटो आहेत.
हॅकर्सच्या या समूहाने इथे धमकीही दिली आहे की जोपर्यंत त्यांना अॅपल किंवा क्वांटाकडून 375 रुपयांची खंडणी मिळत नाही तोपर्यंत ते रोज नवा डेटा प्रसिद्ध करत राहतील. समूहाने असेही सांगितले की ही रक्कम 1 मेच्या आधी मिळायला हवी.