How to blur WhatsApp Chats on Web : सध्याच्या काळात जवळपास सर्वच स्मार्टफोन युजर्स व्हॉट्सअॅपचा वापर करतात. केवळ मोबाइलवरच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा वेब व्हॉट्सअॅपचा वापर करतात. पर्सनल आणि प्रोफेशनल कम्युनिकेशनसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. याच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स पाठवणे, व्हिडिओ कॉल करणे यासारखी कामे खूपच कमी वेळात आणि झटक्यात होतात. आपण ऑफिसमध्ये बसलेलो असताना डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर WhatsApp Web वापरतो मात्र, आपले खासगी मेसेज इतरांना सुद्धा कळतात. तुमचे मेसेज इतर कुणीही वाचू नये असं तुम्हाला वाटत असेल तर ते शक्य आहे. जाणून घ्या कसे...
हे पण वाचा : ही औषधी वनस्पती घशाच्या समस्यांवर रामबाण उपाय
तुम्हाला ऑफिसमध्ये व्हॉट्सअॅप वेब वापरताना प्रायव्हसी हवी असेल तर तुम्ही एका ट्रिकने ते नक्कीच करु शकता. यासाठी तुम्हाला केवळ एक एक्सटेंशन डाऊनलोड करावं लागणार आहे. गुगल क्रोमवर अनेक प्रकारचे एक्सटेंशन्स आहेत त्यापैकी एक एक्सटेंशन म्हणजे WA Web Plus for WhatsApp एक असं एक्सटेंशन आहे जे तुमचे चॅट, कॅन्टॅक्ट सर्वकाही ब्लर करतं. हे ब्लर केल्यावर तुम्ही कोणासोबत चॅट करता आणि काय चॅट होतं हे कुणालाही कळणार नाही.
हे पण वाचा : भुवयांचे केस का गळतात?
हे पण वाचा : या भाज्या खरेदी करायला जाल तर खिसा रिकामा कराल
WA Web Plus for WhatsApp युजर्सला अनेक गोष्टींची मदत करतं. यामध्ये युजर्सला लॉक स्क्रीन पासवर्ड सेट करता येऊ शकतो. हे विशेषपणे तुमच्या खूप कामी येते. म्हणजे हे एक्सटेंशन जेव्हा ऑन असेल तेव्हा तुम्ही ऑफिसमधून तुमच्या सीटवरुन उठल्यावर तुमचे मेसेजेस कुणीही वाचू शकणार नाही आणि जर तुमची व्हॉट्सअॅप विंडो ओपन असेल तेव्हा सुद्धा पासवर्ड शिवाय तुम्ही त्याचा एक्सेस घेऊ शकत नाही.