CRS Mark on Mobile : तुमचा मोबाईल बनावटी तर नाही ना? CRS चिन्ह सांगेल वास्तव

गॅजेट फिव्हर
Updated Apr 13, 2023 | 21:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

CRS Mark on Mobile Phones: ज्याप्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास वेगाने होत आहे, त्याप्रकारे लोकांची फसवणूक करणारे ठग देखील वाढत चालले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फसवणुकीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाच आधार घेतला जात असल्यामुळे, एक ग्राहक म्हणून आपण स्वतः सावध आणि सतर्क असले पाहिजे.

how to identify real and fake mobile phones crs symbol tell truth
आजचे अपग्रेडेड ठग तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कोणाचीही सहज फसवणूक करू शकतात, त्यामुळे आपण स्वतः यांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे झाले आहे.  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंडियन स्टँडर्डनुसार मोबाईल फोनवर CRS मार्क असणे अनिवार्य आहे.
  • CRS मार्क विश्वासार्ह आणि अस्सल उत्पादनाची हमी देते
  • CRS मार्कमध्येदेखील छेडछाड करून फसवणूक केली जाऊ शकते

CRS Mark on Mobile Phones: टेक्नॉलॉजी आणि डिजिटलच्या युगात लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत आणि तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत, प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय असतो. इतकेच नव्हे तर क्रीडा विश्वात मागील काळापासून अनेक मोठे बदल झालेले आहेत. जगात ऑनलाईन खेळाचे वाढते वर्चस्व पाहता, खास गेम खेळण्यासाठी लोकं मोबाइल फोन आणि संगणक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. भारतात संगणकाच्या तुलनेत मोबाईल फोनची विक्री अनेक पटींनी जास्त आहे. त्यामुळे जर मोबाईल विकत घेत आहात आणि या गोष्टीकडे कानाडोळा करत असाल तर तुमची फसवणूक होऊ शकते. (how to identify real and fake mobile phones crs symbol tell truth )

अधिक वाचा : ​आंबेडकर जयंतीला हे भाषण देऊन जिंकाल मन

ऑनलाइन शॉपिंगच्या युगात, आजकाल बहुतेक लोक ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच मोबाइल फोन ऑर्डर करतात. तसेच, दुकानांतूनही मोबाईलची मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहे. तुम्ही अशी अनेक प्रकरणे पाहिली आणि ऐकली असतील की ज्यात हजारो रुपयांच्या मोबाईल फोनऐवजी ई-कॉमर्स कंपन्या एका बॉक्समध्ये पॅक केलेला साबण ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. मोबाईलऐवजी साबण मिळाला म्हणजे फसवणूक झाली असे नाही, तर मोबाईल फोन बॉक्समध्ये फक्त मोबाईल जरी सापडला तरी तुमची फसवणूक होऊ शकते!

CRS चिन्ह मोबाईल फोन बॉक्सवर असावे

भारत सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन अनेक मानके तयार केली आहेत. या अंतर्गत देशात व्यवसाय करणाऱ्या सर्व मोबाईल फोन कंपन्यांसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यांचे काटेकोरपणे पालन केले जाणे गरजेचे असते. भारतात मोबाईल फोन विकणाऱ्या सर्व मोबाईल फोन कंपन्या हँडसेट बॉक्सवर CRS चिन्ह लावतात. हे CRS चिन्ह सूचित करते की तुम्ही खरेदी केलेले उत्पादन हे मानकांनुसार तयार झालेले अस्सल उत्पादन आहे.

अधिक वाचा : ​केडीच्या सेटवर संजय दत्त जखमी

बॉक्सवर CRS चिन्ह नसल्यास काय करावे?

जर मोबाईल फोनवर CRS चिन्ह नसेल तर त्याचा सरळ अर्थ असा होतो की मोबाईल फोन इंडियन स्टँडर्डनुसार बनलेला नाही. म्हणजेच CRS मार्क नसलेला मोबाईल हा बनावट असू शकतो. त्यामुळे आता जेव्हाही तुम्ही नवीन मोबाईल फोन खरेदी कराल तेव्हा त्याच्या बॉक्सवर CRS चिन्ह आहे का हे तपासून पहा. बॉक्सवरील सीआरएस चिन्ह योग्य प्रकारे तयार केले आहे का हे देखील पडताळून पाहण्याची गरज असते. सीआरएस चिन्हच जर चुकीच्या पद्धतीचे असेल तर तो मोबाइल फोन खरेदी करू नका, नाही तर तुमची फसवणूक झालीच म्हणून समझा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी