केवळ 6,999 रूपयांमध्ये घ्या तीन रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन

इनफिनिक्सनं आपला नवीन स्मार्टफोन हॉट 8 भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळत आहे. जाणून घ्या या फोनची किंमत आणि फिचर. 

infinix hot  8
केवळ 6,999 रूपयांमध्ये घ्या तीन रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन 

थोडं पण कामाचं

  • इनफिनिक्स हॉट 8 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे.
  • हा स्मार्टफोन कमी किंमतीत दमदार फिचरसोबत लॉन्च झाला आहे.
  • . इनफिनिक्स हॉट 8 मध्ये 5000 एमएएचची बॅटरी, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एलईडी सपोर्टसोबत, वॉटर ड्रॉप नॉच असलेला 6.52 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

इनफिनिक्स हॉट 8 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन कमी किंमतीत दमदार फिचरसोबत लॉन्च झाला आहे. इनफिनिक्स हॉट 8 मध्ये 5000 एमएएचची बॅटरी, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एलईडी सपोर्टसोबत, वॉटर ड्रॉप नॉच असलेला 6.52 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन दोन रंगांमध्ये लॉन्च झाला. कंपनीनं हा फोन इंट्रोडक्ट्री किंमतीवर लॉन्च केला आहे. जो 30 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असेल.

इनफिनिक्स हॉट 8 चा भारतातली किंमत आणि सेल 

इनफिनिक्स हॉट 8 स्मार्टफोन 7,999 रूपयांच्या किंमतीवर लॉन्च झाला आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत हा स्मार्टफोन 6,999 रूपयांच्या किंमतीवर उपलब्ध होईल. हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. फोन 12 सप्टेंबरला विक्रीसाठी उपलब्ध होईल. फ्लिपकार्टच्या माध्यमातून हा स्मार्टफोन खरेदी केल्यास अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर 10 टक्के, फ्लिपकार्ट अॅक्सिक बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के आणि एचडीएफसी बँक डेबिट कार्डवर 5 टक्के डिस्काऊंट मिळेल. 

ड्युअल सिम सपोर्ट असणारं इनफिनिक्स हॉट 8 स्मार्टफोन एक्स ओएस 5.0 वर आधारित अॅन्ड्रॉई़डवर काम करतं. यात 6.52 इंचाच एचडी प्लस वॉटर ड्रॉप नॉच मिळेल. जो 20:9 आस्पेक्ट रेशिओसोबत मिळेल. डिव्हाईस मीडियाटेक हीलियो पी 22 ऑक्टाकोर प्रोसेसरवर काम करतं. जो 4 जीबी रॅमसोबत मिळेल. फोनमध्ये 64 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. जो मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवून 256 जीबी केला जाऊ शकतो. 

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एक 13 मेगापिक्सलचा, एक दोन मेगापिक्सलचा आणखी एक लो लाइट कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये 8 मेगापिक्सलचा एलईडी फ्लॅश असलेला कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये रिअर फिंगरप्रिंट सेंसर, फेस अनलॉकसारखे फिचर मिळतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...