Fiber Device : घरामध्ये हे एक छोटेसे डिव्हाइस बसवा, अन मिळवा हाय स्पीड नेटवर्क

गॅजेट फिव्हर
Updated Mar 14, 2022 | 13:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Wifi Device । प्रत्येकाला घरबसल्या एक्स्ट्रा पैसे कमवायचे असतात. मात्र आजच्या घडीला अतिरिक्त पैसे कमवणे खूप अवघड झाले आहे कारण बहुतांश लोकांना पैसे कमावण्याचे योग्य मार्ग सापडत नाही त्यामुळे ते इतरत्र भरकटत असतात.

Install fiber internet connection at home and get the fastest internet
घरामध्ये हे एक छोटेसे डिव्हाइस बसवा, अन कमवा करोडो रूपये  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फायबर इंटरनेट कनेक्शन बाजारात वेगाने लोकप्रिय होत आहे.
  • फायबर इंटरनेट कनेक्शनमध्ये कोणत्याही व्यत्ययाशिवाय इंटरनेट चालवण्यासाठी हाय स्पीड इंटरनेटची ऑफर दिली जाते.
  • फायबर इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने वेगाने कंटेट तयार केले जाऊ शकते.

Wifi Device । मुंबई : प्रत्येकाला घरबसल्या एक्स्ट्रा पैसे कमवायचे असतात. मात्र आजच्या घडीला अतिरिक्त पैसे कमवणे खूप अवघड झाले आहे कारण बहुतांश लोकांना पैसे कमावण्याचे योग्य मार्ग सापडत नाही त्यामुळे ते इतरत्र भरकटत असतात. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या काळात जर कोणी ठरवले तर ते स्मार्टफोनच्या मदतीने लाखो रूपये कमावू शकतात. मात्र या साठी हायस्पीड इंटरनेटची देखील गरज असते. (Install fiber internet connection at home and get the fastest internet). 

तुम्ही ज्या कंपनीचे सिमकार्ड वापरत आहात त्या कंपनीच्या डेटा प्लॅनने तुम्ही इंटरनेट वापरू शकता असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची स्पीड खूप कमी आहे. त्यामुळे अशावेळी तुम्ही अधिक पैसे कमावू शकत नाही. त्यामुळे आज आपण अशा काही इंटरनेट कनेक्शनबाबत भाष्य करणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही देखील हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता.  

अधिक वाचा : या तारखांना जन्मलेली लोक भाग्यवान असतात

फायबर इंटरनेट कनेक्शन

लक्षणीय बाब म्हणजे फायबर इंटरनेट कनेक्शन बाजारात वेगाने लोकप्रिय होत आहे. या फायबर इंटरनेट कनेक्शनमध्ये तुम्हाला कोणत्याही व्यत्ययाशिवाय इंटरनेट चालवण्यासाठी हाय स्पीड इंटरनेटची ऑफर दिली जाते. काही लोक कमी खर्च करतात आणि इंटरनेट वापरण्यासाठी त्यांच्या स्मार्टफोनवरून हॉटस्पॉटच्या मदतीने त्यांचे डिव्हाइस चालवतात आणि नेटचा वापर करतात ज्यामध्ये इंटरनेटची स्पीड देखील खूप कमी असते आणि नेट देखील खूप लवकर संपते. फायबर इंटरनेट कनेक्शनद्वारे नेटची स्पीड खूप वाढते त्यामुळे तुमचे कोणतेही ऑनलाइन काम कोणत्याही अडथळ्यांव्यतिरिक्त पूर्ण करता येते. 

अधिक वाचा : रोहितच्या सिक्सने फोडले क्रिकेट चाहत्याचे नाक

कंटेट बनवणाऱ्यांसाठी फायदेशीर 

जर तुम्ही यूट्यूब किंवा फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून कंटेट तयार करत असाल अथवा व्हिडिओ बनवत असाल तर तुमच्याकडे हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन असणे खूप गरजेचे आहे. यासाठी महत्त्वाचा पर्याय म्हणजे आपल्या घरात एक फायबर कनेक्शन लावा कारण फायबर इंटरनेट कनेक्शनच्या मदतीने तुम्ही वेगाने कंटेट तयार करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी