iPhone 11 Prices: आयफोन 11 लॉन्च, जाणून घ्या फिचर आणि किंमत 

अॅप्पलनं आयफोन 11 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा फिचर देण्यात आला आहे. त्यासोबतच हा स्मार्टफोन ए13 बायोनिक्सवर काम करतं. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर. 

Iphone 11
iPhone 11 Prices: आयफोन 11 लॉन्च, जाणून घ्या फिचर आणि किंमत  

थोडं पण कामाचं

  • अॅप्पलनं कंपनीनं नवीन आयफोन लॉन्च केला आहे.
  • कंपनीनं तीन नवीन आयफोन लॉन्च केलेत. जो आयफोन 11 सीरिजचा भाग आहे.
  • या सीरिजमध्ये सर्वात पहिला आयफोन 11 आहे.
  • अॅप्पलनं आयफोन 11 तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे.

अॅप्पलनं कंपनीनं नवीन आयफोन लॉन्च केला आहे. कंपनीनं तीन नवीन आयफोन लॉन्च केलेत. जो आयफोन 11 सीरिजचा भाग आहे. या सीरिजमध्ये सर्वात पहिला आयफोन 11 आहे. ज्याची सर्वांत कमी किंमत आहे. अॅप्पलनं आयफोन 11 तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. ज्यात 64 जीबी स्टोरेज, 128 जीबी स्टोरेज आणि 256 जीबी स्टोरेजच्या पर्यायासोबत उपलब्ध आहे. 

अॅप्पलनं आयफोन 11 मध्ये 6.1 इंचाचा लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. हा फोन एलसीडी स्क्रीनसोबत येतो. यात मल्टी टच डिस्प्ले देण्यात आला आहे. जो आयपीएस टेक्नोलॉजीसोबत येईल. डिस्प्लेवर फिंगरप्रिंट रेजिस्टेंट कोटिंग मिळणार आहे. यात मल्टी लॅंगवेज सपोर्ट देण्यात आला आहे. यात 6.06 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. 

हा स्मार्टफोन स्प्लॅश, वॉट आणि डिस्ट रेजिस्टेंट आहे. हा स्मार्टफोन IP६८ रेटिंगसोबत येतो. अॅप्पलनं यात A13 बायोनिक्सचा वापर केला आहे. जो थर्ड जेनरेशन न्यूरल इंजिनसोबत ग्राहकांना मिळणार आहे. 

कॅमेरा फिचरबद्दल बोलायचं झाल्यास, यात 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा व्हाईड आणि व्हाईड एंगल ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. या कॅमेऱ्याच्या मदतीनं यूजर्स 4k व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकतात. याव्यतिरिक्त कंपनीनं यात 12 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. जो एफ 2.2 अपर्चरसोबत येईल. कंपनीनं यात ट्रू डेप्थ कॅमेरा दिला असून जो चांगला फेस आयडी फिचरसोबत मिळेल. 

स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ 5, एलटीई, एनएफसी, एक्स्प्रेस कार्ड, बिल्ट इन जीपीएस, डिजीटल कंपास, वायफाय, फेसटाइम व्हिडिओ कॉलिंग, व्होएलटीई फिचर देण्यात आलं आहे. या फोनमध्ये 18 वॉटची फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. ज्याच्या मदतीनं फोन 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. फोन वायरलेस चार्जिंग फिचरसोबत येईल. हा स्मार्टफोन आयओएस 13 वर काम करेल. अॅप्पलनं हा स्मार्टफोन 699 डॉलर (जवळपास 53 हजार रूपये) च्या किंमतीवर लॉन्च केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...