iPhone 11 Pro And Max: अॅप्पलकडून तीन रिअर कॅमेरा असलेले स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत

अॅप्पलनं तीन नवीन आयफोन लॉन्च केलेत. कंपनीनं आयफोन 11 सीरिजमध्ये तीन रिअर कॅमेरा फिचर असलेले आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स लॉन्च केलेत. जाणून घ्या यांची किंमत आणि फिचर.

iPhone 11 Pro Max
आयफोन 11 प्रो आणि 11 प्रो मॅक्सची किंमत आणि फिचर जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

  • अॅप्पलनं आयफोन 11 सीरिजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेत.
  • या सीरिजमध्ये आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स स्मार्टफोन येतात.
  • ज्याचे फिचर एकसारखेच आहेत. केवळ यांच्या स्क्रिन साइजमध्ये फरक आहे. दोन्हीही स्मार्टफोन एकसारख्या फिचरसोबत येतात.

अॅप्पलनं आयफोन 11 सीरिजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च केलेत. या सीरिजमध्ये आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स स्मार्टफोन येतात. ज्याचे फिचर एकसारखेच आहेत. केवळ यांच्या स्क्रिन साइजमध्ये फरक आहे. दोन्हीही स्मार्टफोन एकसारख्या फिचरसोबत येतात. आयफोन 11 प्रो 5.8 इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसोबत येतो. आयफोन 11 प्रो मॅक्स 6.5 इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसोबत मिळेल. दोन्हीही फोनमध्ये एचडीआर सपोर्ट देण्यात आला आहे.

अॅप्पलनं या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ट्रू टोन डिस्प्ले, व्हाइड कलर डिस्प्ले, हॅप्टिक टच, फिंगरप्रिंट रजिस्टेंट कोटिंग, मल्टीपल लॅंगवेज सपोर्ट दिला आहे. हा स्मार्टफोन स्पॅश, वॉटर आणि डस्ट रजिस्टेंट आहे. तसंच हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसोबत येणार आहे. कंपनीनं दोन्ही फोनमध्ये A13 बियोनिक्स चिप दिली आहे. जी थर्ड जनरेशन न्यूरल इंजिनसोबत येईल. 

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, दोन्ही स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, वाइड आणि टेलीफोटो कॅमेरा फिचर देण्यात आलेत. फोनमध्ये विविध कॅमेरा मोड जसं की, पॅनोरोमा, नाइट मोड असे दिलेत. फ्रंटमध्ये एफ 2.2 अपर्चरचा 12 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. जो पोर्टरेट मोड आणि डेप्थ सेंसरसोबत येईल. 

आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 प्रो मॅक्स दोन्ही स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ 5.0, एनएफसी, जीपीएस, डिजीटल कंपास, वायफाय, व्हिडिओ कॉलिंग, वोएलटीई, वायफाय कॉलिंग अशा सुविधा मिळतील. 

कंपनीनं दावा केला आहे की, आयफोन 11 प्रोमध्ये 18 तासांचा व्हिडिओ प्ले बॅक टाइम मिळतो. तर आयफोन 11 प्रो मॅक्समध्ये 20 तासांचा व्हिडिओ प्ले टाइम मिळेल. दोन्ही ही फोन 18 वॉटच्या एडॉप्टरसोबत येतील. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्चिंग फिचर मिळतील. ज्याच्या मदतीनं फोन 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यत चार्ज केले जाऊ शकतात. आयफोन 11 प्रो ची किंमत 999 डॉलर (जवळपास 71 हजार रूपये) आणि आयफोन 11 प्रो मॅक्सची किंमत ( जवळपास 79 हजार रूपये) आहे. हा स्मार्टफोन 27 सप्टेंबरला उपलब्ध होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...