iPhone 14 Price : iPhone 14 लॉंच झाल्यापासून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. iPhone 14 आणि iPhone 13 दिसायला सारखेच असले तरी त्यांचे फिचर्सपण मिळते जुळते आहेत. खूप लोकांना हा फोन खरेदी करायचा आहे, पण फोनवर डिस्काउंट मिळत नाही आहे. सध्या बऱ्याच ऑफर्स या फोनवर दिल्या जात आहेत. जाणून घेउया कोणत्या ऑफर्स आहेत.
iPhone 14 ची मूळ किंमत 79 हजार 900 रुपये इतकी आहे. पण तुम्ही हा फोन 52 हजार 900 रुपये किंमतीत खरेदी करु शकता. या फोनसोबतच 10 टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. यानंतर तुम्हाला हा फोन 71 हजार 999 रुपयांना मिळेल. फोनवर एक्सचेंज ऑफर पण उपलब्ध आहेत. जर तुम्ही तुमचा फोन एक्सचेंज केला तर 19 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. आणि जर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळत असेल तर फोन तुम्हाला 52 हजार 999 रुपयांना मिळू शकतो.
अधिक वाचा :Stock Market: स्टॉक ट्रेडिंगमध्ये करिअर कसे बनवायचं?
बॅंक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवरुन जर पेमेंट केले तर 7.5 टक्के इंस्टेट डिस्काउंट मिळेल.यूनियन बँक मास्टर कार्ड डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट उपलब्ध आहे. एचएसबीसी कॅशबॅक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. याशिवाय, ईएमआय वर सुद्धा फोनला खरेदी करू शकता. तुम्ही दर महिना ३४४० रुपये देवून या फोनला घेवून जावू शकता.
अधिक वाचा :सरड्याप्रमाणे रंग बदलणारी कार
आयफोन १४ मध्ये ६.६ इंचाची स्क्रीन आहे. जी 1170x2532 पिक्सल रिजोल्यूशन सोबत येते. सोबत या फोनमध्ये Apple A15 Bionic चिपसेट दिले आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे. सोबत १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन तीन स्टोरेज मध्ये येतो. ज्यात १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. हा फोन iOS 16 वर काम करतो.