जिओचा ग्राहकांना मोठा झटका, फुकटात व्हॉईस कॉलिंग बंद; मोजावे लागणार पैसे

jio रिलायन्स जिओचं मोफत व्हॉईस कॉलिंग आता बंद करण्यात आलं असून इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी यूजर्संना प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागणार आहेत. 

jio's big decision now customers have to pay 6 paise per minute for calls on other networks
जिओकडून फुकटात व्हॉईस कॉलिंग बंद, मोजावे लागणार पैसे  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • जिओच्या ग्राहकांना आत फुकटात व्हॉईस कॉलिंग मिळणार नाही
  • इतर नेटवर्कवरील व्हॉईस कॉलिंगसाठी ६ पैसे प्रति मिनिट मोजावे लागणार
  • जिओच्या निर्णयाने ग्राहकांना मोठा झटका

मुंबई: रिलायन्स जिओने एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी आता पैसे मोजावे लागणाल आहेत. आतापर्यंत जिओकडून फ्री कॉलिंग सेवा देण्यात येत होती. आययूसी व्यवस्थेवर ट्रायच्या रिव्ह्यू निकालानंतर जिओने इतर नेटवर्कवरील कॉलिंगसाठी ६ पैसे प्रति मिनिट दर निश्चित केला आहे. जिओने याबाबत माहिती देताना असं म्हटलं की, जिओवरील व्हॉईस कॉलिंग मोफतच आहे. पण भारती एअरटेल, आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांना मात्र, १३,५०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे हे निर्णय घेण्यात आला आहे. 

कंपनीचं असं म्हणणं आहे की, ट्रायच्या निर्णयानंतर जिओला होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी कंपनीने प्रतिस्पर्धी नेटवर्कवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना चार्ज लागून करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पहिलीच वेळ आहे की, ज्यामध्ये जिओ ग्राहकांना फ्री कॉलिंगऐवजी व्हॉईस कॉलसाठी पैसे घेणार आहे. सध्या कंपनी फक्त डेटासाठी यूजर्सकडून पैसे घेत आहे. तर व्हॉईस कॉलिंग मोफत दिलं जात होतं. 

जिओने असा आरोप केला आहे की, इतर ऑपरेटर्सकडून जिओच्या नंबरवर मोठ्या प्रमाणात मिस्ड कॉल येतात. जिओ नेटवर्कवर जवळजवळ २५ ते ३० कोटी मिस्ड कॉल येतात. ज्यामुळे कंपनीच्या नेटवर्कवर इनकमिंग ट्राफिकचे ६५ ते ७५ कोटी मिनिटं प्रभावित होतात. जे जिओ नेटवर्कवरुन इतर ऑपरेटरवर केले जातात. 

किती लागणार चार्ज आणि कशावर मिळणार फ्री कॉलिंग? 

जिओने अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ६ पैसे प्रति मिनिट दर आकारला आहे. म्हणजेच जिओ नेटवर्कवरुन दुसऱ्या क्रमांकावर कॉल करण्यासाठी यूजर्सला प्रति मिनिट ६ पैसे मोजावे लागणार आहे. पण जिओ टू जिओ व्हॉईस कॉलिंग मोफतच असणार आहे. तसंच इनकमिंग कॉल देखील मोफत असणार आहे. याशिवाय लँडलाइन कॉलिंग देखील मोफत असणार आहे. 

किती रुपयांचा येणार टॉप अप? 

जिओने ग्राहकांना भराव्या लागणाऱ्या अतिरिक्त पैशांसाठी एक नवी शक्कल लढवली आहे. म्हणजेच व्हॉईस कॉलिंगच्या टॉप अपवर जिओन अतिरिक्त डेटा मोफत देणार आहे. यासाठी कंपनीने चार टॉप अपची घोषणा केली आहे. पाहा कसे आहेत जिओच्या या चार टॉप अपचे प्लॅन: 

  1. १० रुपयांचा टॉपअप: १२४ मिनिटं इतर नेटवर्कसाठी व्हॉईस कॉलिंग आणि १ जीबी डेटा मोफत 
  2. २० रुपयांचा टॉपअप: २४९ मिनिटं इतर नेटवर्कसाठी व्हॉईस कॉलिंग आणि २ जीबी डेटा मोफत 
  3. ५० रुपयांचा टॉपअप: ६५६ मिनिटं इतर नेटवर्कसाठी व्हॉईस कॉलिंग आणि ५ जीबी डेटा मोफत 
  4. १०० रुपयांचा टॉपअप: १३६२ मिनिटं इतर नेटवर्कसाठी व्हॉईस कॉलिंग आणि १० जीबी डेटा मोफत 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी