शाओमीचा खास दिवाळी सेल, स्मार्टफोनपासून एलईडी टीव्हीपर्यंत सगळ्यावर बंपर सूट 

Xiaomi Diwali With Mi sale: शाओमी दिवाळी विथ मी सेलचा आज शेवटचा दिवस आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शाओमीने बर्‍याच चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. 

redmi_9_note
शाओमीचा खास दिवाळी सेल, स्मार्टफोनवर बंपर सूट  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: शाओमीने (Xiaomi) आपल्या वेबसाईटवर 'Diwali With Mi' या सेलची सुरुवात केली आहे. या सेलचा हा आजचा (२८ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. जर आपण स्मार्ट गॅझेटचे चाहते असाल तर आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. कारण शाओमीने त्यांच्या उत्पादनांवर जबरदस्त सूट दिली आहे. Mi टीव्ही आणि लॅपटॉप व्यतिरिक्त तुम्ही कमी किंमतीत स्मार्टफोन खरेदी करू शकता. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शाओमी स्मार्टफोनवर १० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय एचडीएफसी कार्डवरही त्वरित डिस्काउंट उपलब्ध आहे. तर इथे आम्ही आपल्याला शाओमी स्मार्टफोनवरील बेस्ट डिल्सची माहिती देणार आहोत.

Mi10 स्मार्टफोनवर सुमारे १० हजार रुपयांची सूट

शाओमीच्या  Mi10 स्मार्टफोनवर 10 हजारांची सूट मिळत आहे. आता तुम्ही ५४,९९९ रुपये किंमतीचा स्मार्टफोन ४४,९९९ रुपयांचा खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये 108-मेगापिक्सलचा कॅमेरा, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 4780 mAh बॅटरी, 6.67 इंचाचा अमोलेड डिस्प्ले, 30W वेगवान चार्जिंग आहे.

रेडमी नोट 9 सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनवर सूट

रेडमी नोट 9, रेडमी नोट 9 प्रो आणि रेडमी नोट 9 प्रो मॅक्सवर ४००० रुपयांची सूट आहे. डिस्काउंटनंतर हे तीन फोन अनुक्रमे 11,499, 12,999 आणि 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. तिन्ही स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा आणि 5020 एमएएच बॅटरी असे फीचर्स आहेत.

रेडमी 9 प्राइमवर 3 हजारांची सूट

दिवाळी विथ मी सेलमध्ये तुम्ही हा फोन 9,999 रुपयांच्या सवलतीत खरेदी करू शकता. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर क्वॉड रियर कॅमेर, 6.53 इंचाचा डिस्प्ले आणि 5020 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

रेडमी 20  वर ४००० रुपयांची सूट

रेडमी के 20 प्रो  स्मार्टफोनवर ४ हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. आता आपण 28,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन फक्त 24,999 रुपये खरेदी करु शकता. या स्मार्टफोन मध्ये 48MP+13MP+8MP असे तीन रियर कॅमेरा आहेत. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, 6.39 इंच का Amoled डिस्प्ले, 4000mAh बॅटरी आणि 27वॉट फास्ट चार्जिंग उपलब्ध आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी