LG G8s ThinQ: एलजीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर 

LG G8s ThinQ: एलजीनं भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन एलजी जी8एस थिंक लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसोबत मिळेल.

LG G8s ThinQ
LG G8s ThinQ: एलजीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर  

थोडं पण कामाचं

  • एलजीनं आपला जी सिरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला.
  • कंपनीनं एलजी जी8एस थिंक स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे.
  • हा स्मार्टफोन हॅंड आयडी फिचरसोबत येईल.

एलजीनं आपला जी सिरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीनं एलजी जी8एस थिंक स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन हॅंड आयडी फिचरसोबत येईल. जो इंफ्रोरेड लाइटचा वापर करून यूझरचा फोन पकडण्याच्या आधारावर ऑथेंटिकेशन चेक करतो. या अतिरिक्त टचलेस हँड गेस्चर फिचर देण्यात आला आहे. ज्याला कंपनीनं एअर मोशन नाव दिलं आहे. 

हे फिचर विविध फंक्शनला टच न करता वापर करण्याची सुविधा देणार आहे. एलजी जी8एस थिंक क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरवर काम करतो. या फोनला Ip 68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट रेटिंग दिली आहे. 

एलजी जी8एस थिंक प्राइस 

एलजी जी8एस थिंक स्मार्टफोनची भारतात किंमत 36,990 रूपये आहे. हा किंमत फोनच्या 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आहे. हा फोन मिरर ब्लॅक, मिरर टील आणि मिरर व्हाइट कलरच्या पर्यायासोबत उपलब्ध आहे. हा सेल 29 सप्टेंबरपासून भारतात विविध दुकानांमधून खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन अॅमेझॉनवर 35,990 रूपयांना खरेदी करू शकता. 

एलजी जी8एस थिंकचे फिचर 

एलजी जी8एस थिंक स्मार्टफोन अॅन्ड्रॉईडवर काम करतो. हा स्मार्टफोन 6.2 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्लेसोबत येईल. फोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर लावण्यात आला आहे. जो 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसोबत येतो. 

एलजी जी8एस थिंकमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा लेंस, 13 मेगापिक्सलचा वाईड एंगल सेंसर आणि 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंससोबत मिळेल. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हँड आयडी, एअर मोशन आणि फेस अनलॉक ऑर्थेंटिकेशनवर काम करतो. या फोनमध्ये एलजीन 3,550 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते. फोन टाइप सी चार्जिंग आणि रिअर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी