Mobile Phones : कोणत्या पॉकेटमध्ये ठेवला पाहिजे फोन? चुकीच्या खिशात ठेवल्यास होईल हे नुकसान

गॅजेट फिव्हर
Updated Mar 03, 2023 | 13:22 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Where to keep your phone : बहुतांश लोकं आपला Mobile Phone शर्टच्या खिशात ठेवतात आणि तुम्हला ते चुकीचे वाटते. हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण त्यामागचे कारण खूप मोठे आहे. मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराच्या अवयवांना हानी पोहोचवू शकतात.

In which pocket should the phone be kept?
शर्टच्या खिशात ठेवल्यास हृदयाला त्रास होऊ शकतो  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • शर्टच्या खिशात ठेवल्यास हृदयाला त्रास होऊ शकतो
  • पॅन्टमध्ये ठेवल्यास प्रायव्हेट पार्टला त्रास होऊ शकतो
  • कोणतेही काम न करताही स्मार्टफोन स्क्रोल करतात

Where to keep your phone : आपल्या सर्वांकडे मोबाईल फोन आहे. आपल्या जीवनातील आवश्यक घटकांपैकी एक घटक मोबाईल बनला आहे. आपण मोबाईल वापरताना तो ठेवण्याविषयी अनेकजण चुकी करत असतात. बहुतांश लोक आपला (Mobile Phone) मोबाईल फोन शर्टच्या खिशात ठेवतात. तुम्हला ते चुकीचे वाटते का? हा खूप मोठा प्रश्न आहे, कारण त्यामागचे कारण खूप मोठे आहे. मोबाईल फोनमधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराच्या अवयवांना हानी पोहोचवू शकतात.

मोबाईल शर्टच्या खिशात ठेवल्यास हृदयाला त्रास होऊ शकतो आणि पॅन्टमध्ये ठेवल्यास प्रायव्हेट पार्टला त्रास होऊ शकतो. मग तो कुठे आणि कसा ठेवायचा? जाणून घेऊया

अधिक वाचा : जगातील सर्वात मजबूत वॉटरप्रूफ मोबाईल

आजकाल स्मार्टफोनचा वापर इतका वाढला आहे की मोबाईलला स्वतःपासून वेगळे ठेवणे अशक्य झाले आहे. लोक सतत मोबाईल सोबत ठेवतात. सर्व लोक मोबाईलच्या सवयीने इतके मजबूर झाले आहेत की ते कोणतेही काम न करताही स्मार्टफोन स्क्रोल करतात. फोन हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, परंतु हा मोबाईल फोन त्यांच्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. 

फोनचा वापर इतका वाढला आहे की, लोकं टॉयलेट मध्येही घेऊन जायला लागले आहेत.  नेहमी जवळ ठेवण्यासाठी खिशात ठेवातात.खासकरुन हे पुरूषांच्या बाबतीत जास्त घडते. अनेकवेळा पुरुष घरात राहूनही खिशात स्मार्टफोन ठेवतात आणि बाजारात जाताना सोबत ठेवतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, मोबाईल ठेवण्यात सर्वजण चुकी करतात. मोबाईल बाळगत तो नेमका कुठे ठेवायचा हे  100 पैकी 100 पुरुषांना हे माहिती नसेल. मोबाईल फोन चुकीच्या ठिकाणी ठेवला तर मोठे नुकसान होऊ शकते याची जाणीव सुद्धा कोणालाच नसेल.

अधिक वाचा : फोटो काढण्यासाठी बेस्ट अँड्रॉईड अॅप

फोन खिशात ठेवण्याचे काय तोटे आहेत?

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही फोन तुमच्या खिशात वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट ठेवता तेव्हा तुमच्या शरीराला 2 ते 7 पट रेडिएशनचा सामना करावा लागतो. हे तुमची डीएनए रचना देखील बदलू शकते. यामुळे नपुंसकत्वाचा धोका असतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मग कुठे ठेवायचा स्मार्टफोन?

तुमचा स्मार्टफोन कोणत्याही खिशात ठेवू नका जिथून तुमचे नाजूक भाग जवळ आहेत. 

तुमचा स्मार्टफोन फोन पर्स किंवा बॅगेत ठेवा, पण जर तुम्ही हे करू शकत नसाल तर स्मार्टफोन मागील खिशात ठेवा.

येथे स्मार्टफोन ठेवताना हे देखील लक्षात ठेवा की त्याची मागील बाजू वर राहावी जेणेकरून तुमचे शरीर स्मार्टफोनच्या किमान रेडिएशनच्या संपर्कात येईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी