‘मदर्स डे’ स्पेशल: आईला गिफ्ट्स देण्यासाठी या खास आयडिया, जाणून घ्या

गॅजेट फिव्हर
Updated May 08, 2019 | 18:44 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Mother’s Day 2019 Gift Ideas: यंदा ‘मदर्स डे’ निमित्त आपण आपल्या आईला लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स किंवा गॅझेट्स भेट देऊ शकतो. अशी एक लिस्टच आज आपण पाहणार आहोत... जाणून घ्या...

mothers day special
आईला द्या हे खास गिफ्ट्स  |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबई: काही दिवसांनी संपूर्ण जगात ‘मदर्स डे’ साजरा केला जाणार आहे. अजूनही आपण आपल्या आईला काय गिफ्ट देणार हेच ठरवत असाल तर आमच्याकडे आपल्यासाठी काही युनिक आयडिया आहेत. आपण दरवर्षीप्रमाणे एखादं किचनसंबंधातील गिफ्ट्स देणार असाल तर खरंच थांबा. यंदा काही नवीन म्हणजेच गॅझेट्स द्यायचा विचार करा. आधुनिक जगाची आधुनिक आई म्हणून तिच्यासाठी जरा गॅझेटचा विचार करा. गेल्या पाच पर्षात तंत्रज्ञानानं उत्तम प्रगती केली आहे आणि ती अशीच अविरत चालूच आहे. त्यामुळे आता आपल्याला आकर्षक पण आवश्यक असे गॅझेट्स अगदी स्वस्त दरात उपलब्ध होतात.

रिअलमी बड्स (रुपये ४९९)

‘द रिअलमी बड्स’ हे भारतातील पहिले वायर्ड हेडफोन्स आहेत. यामध्ये मॅग्नेटिक लॉकिंग आहेत. ते ब्रेक रेसिस्टंट असून यासाठी केवलार फायबर कॉडचा वापर करण्यात आलेला आहे आणि याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी तीन बटन दिलेले आहेत. ४५ डिग्रीचे याचे इअर टीप आहेत. याचा वापर खूप काळासाठी उत्तमप्रकारे करता येतो. 

Honor Band 4

होनर बॅन्ड ४ (रुपये २,४९९)

सध्या स्वतःला फिट ठेवण्याचं क्रेझ आहे. मग त्यासाठी फिटनेस बॅन्ड वापरण्याचाही ट्रेंड वाढत चालला आहे. ऑनर बँड 4 हा 0.95 इंच एएमओएलडी टच डिस्प्लेसह आहे. तसंच, यामध्ये आपल्याला 2.5 डी कर्व्ह ग्लास, सतत हृदयाच्या ठोक्यांवर लक्ष ठेवेल, वॉटर रेझिस्टंट यासारखे अनेक फीचर्स मिळतात. फिटनेस बँडमध्ये ट्रू-स्लीप 2.0 तंत्रज्ञान देखील समाविष्ट आहे. यामुळे आपल्या झोपेचा सायकलवर लक्ष ठेवता येतं. यामध्ये हुवाई ड्रुसीन २.० हार्ट रेट फीचर आहेत. यामुळे आपण २४ तास म्हणजेच चालतांना, धावतांना, सायकल चालवतांना सारख्या हालचालींमध्ये आपण आपल्या हृदयाचं निरीक्षण करू शकतो.

            

सारेगामा कारवा गो (रुपये ३,९९०)

सारेगामा कारवा गो ब्लुटूथ कनेक्टिव्हिटीबरोबर येतो. याचा वापर गाणे ऐकण्यासाठी होतो. यामध्ये एफएमसह आपल्याला तीन हजार गाणी ऐकता येतात. तसंच मायक्रो एसडी कार्डचीही सुविधा आहे.

Boltt Smart Shoe

बोल्ट स्मार्ट शूज (रुपये १,९९९)

बोल्ट स्मार्ट शूज स्पोर्ट्स शूज एकदम आरामदायक आहेत, कमी वजनाचे आहेतच पण यामध्ये आपण किती चाललो याचीही माहिती मिळते. यात आपण किती कॅलरीज बर्न केल्या आणि एका मिनीटामध्ये किती पावले चाललो अशा सर्व गोष्टींची नोंद होते. यातील स्टेप ट्रॅकर आपण इतर शूजसाठी वापरू शकतो फक्त त्यात लेस लावलेल्या असल्या पाहिजेत. जेव्हा पेडोमीटरचा वापर होत नाही, तेव्हा ते आपणहूनच बंद होतं आणि आपणहून सुरू होतं. याची बॅटरीही खूप चालते. यामध्ये आपण पर्सनल ट्रेनर म्हणूनही वापर करू शकतो.

Amazon Fire TV Stick

अॅमेझॉन फायर टिव्ही स्टिक

हे डिव्हाईस देणं हे ही उत्तम गिफ्ट आहे. याची किंमत अवघी ३,९९९ रुपये इतकी आहे. 


फिटबिट चार्ज २ स्मॉल (रुपये ६,४९९९)


आपली आई फिटनेस कॉन्शियस असेल तर, तिच्यासाठी यापेक्षा चांगलं फिटनेस टूल कोणतंही असू शकत नाही. फिटबिट चार्ज २ रोजच्या व्यायामावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य आहे. तसंच ते आपल्याला व्यायामाबद्दल आठवणही करून देतं.

Powerbank

पॉवर बँक

आपली आई स्मार्ट फोन वापरत आहे आणि तिचा वापरही खूप आहे. तर पॉवर बँक हे तिच्यासाठी उत्तम गिफ्ट ठरेल. आपल्याला हव्या असलेल्या बजेटमध्ये हे गिफ्ट आपण सहज घेऊ शकतात.

स्मार्टफोन

आपल्या रोजच्या जीवनामध्ये स्मार्टफोन आता अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपल्या आईला फोनमध्ये काही नवीन हवं असेल किंवा आपल्या आईकडे अजूनही स्मार्टफोन नसेल तर हा ऑप्शनही आपल्यासाठी उत्तम आहे. आपलं बजेट कितीही कमी असलं तरी आता आपल्याकडे अनेक ऑप्शन आहेत. यात सॅमसंग गॅलेक्सी एम१०, रेडमी नोट ७ प्रो, नोकिया ४.२ आणि असे अनेक ब्रॅन्डचे फोन आपल्या बजेटमध्ये मिळतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
‘मदर्स डे’ स्पेशल: आईला गिफ्ट्स देण्यासाठी या खास आयडिया, जाणून घ्या Description: Mother’s Day 2019 Gift Ideas: यंदा ‘मदर्स डे’ निमित्त आपण आपल्या आईला लेटेस्ट टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स किंवा गॅझेट्स भेट देऊ शकतो. अशी एक लिस्टच आज आपण पाहणार आहोत... जाणून घ्या...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola