Motorola One Macroचा तीन रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च, 10  हजारपेक्षाही कमी आहे किंमत 

Motorola One Macro Price: मोटोरोला वन मॅक्रो स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 10 हजार रूपयांपेक्षाही कमी असलेल्या बजेटमध्ये तीन रिअर कॅमेरा सेटअपसोबत येईल.

Motorola One Macro
Motorola One Macroचा तीन रिअर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च 

मुंबईः मोटोरोलानं भारतात नवीन स्मार्टफोन मोटोरोला वन मॅक्रो लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या नावावरूनच स्पष्ट होत आहे की, या स्मार्टफोनचं मुख्य फोकस मॅक्रो फोटोग्राफीवर आहे. हा स्मार्टफोन डेडिकेटेड मॅक्रो सेंसरसोबत येईल. फोनमध्ये 6.2 इंचाचा वॉटर ड्रॉप नॉच असलेला डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर मीडियाटेक हीलिओ P70 प्रोसेसर असेल. कंपनीचं म्हणणं आहे की, हा स्मार्टफोन वॉटर रेपेलेंट डिझाइन आणि आयपीएक्स 2 रेटिंगसोबत येईल. फोनमध्ये तीन रिअर कॅमेरा आणि लेझर ऑटोफोकस मॉड्यूल दिलं आहे. 

मोटोरोला वन मॅक्रोची किंमत आणि उपलब्धता

मोटोरोला वन मॅक्रो स्मार्टफोन केवळ एका व्हेरिएंटमध्ये लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. ज्याची किंमत 9999 रूपये आहे. हा स्मार्टफोन केवळ स्पेस ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. मोटोरोला वन मॅक्रोला तुम्ही 12 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. या फोनवर जिओचा 2200 रूपयांचं कॅशबॅक आणि 125 जीबी अतिरिक्त डेटा ऑफर मिळत आहेत. 

Motorola One Macro चं स्पेसिफिकेशन 

ड्युअल सिम सपोर्ट असलेला स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 9 वर काम करतं. हा फोन स्टॉक इंटरफेससोबत येईल. स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा एचडी प्लस मॅक्स व्हिजन डिस्प्लेसोबत मिळणार. स्मार्टफोन ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसरवर काम करतं. जो 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसोबत येईल. 

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो लेंस दिला आहे. यासोबत डिव्हाईसमध्ये लेझर ऑटो फोकस मॉड्यूल आहे. मोटोरोला वन  मॅक्रोमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 3.5 एमएम जॅक आणि यूएसबी टाइप सी पोर्ट आहे. डिव्हाईसला पावर देण्यासाठी 4000 एमएएच ची बॅटरी दिली आहे. जो 10 वॉटचं फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...