Nokia 6.2: नोकियाचा नवा स्मार्टफोन नोकिया 6.2 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर 

Nokia 6.2 Price: नोकियानं आपला नवीन स्मार्टफोन नोकिया 6.2 भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. जाणून घ्या फोनची किंमत. 

Nokia 6.2 Price in India
Nokia 6.2: नोकियाचा नवा स्मार्टफोन नोकिया 6.2 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर  

थोडं पण कामाचं

  • नोकियानं देशात आपला नवीन स्मार्टफोन नोकिया 6.2 (Nokia 6.2) लॉन्च केला आहे.
  • या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच, 3500 एमएएचची बॅटरी, फुल एचडी प्लस डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 64 जीबीचा स्टोरेज मिळेल.
  • कंपनीनं या फोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर दिला आहे.

नोकियानं देशात आपला नवीन स्मार्टफोन नोकिया 6.2 (Nokia 6.2) लॉन्च केला आहे. एचएमडी ग्लोबलनं हा स्मार्टफोन गेल्या महिन्यात बर्लिनमध्ये झालेल्या आयएफए टेक फेअरमध्ये सादर केला होता. या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप स्टाइल नॉच, 3500 एमएएचची बॅटरी, फुल एचडी प्लस डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 64 जीबीचा स्टोरेज मिळेल. कंपनीनं या फोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर दिला आहे. जो 4 जीबी रॅमसोबत येईल. फोनची डिझाईन जास्त प्रमाणात नोकिया 7.2 सारखी आहे. 

Nokia 6.2 ची किंमत 

अॅमेझॉनवर लिस्टिंगनुसार, नोकिया 6.2 स्मार्टफोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसोबत 15,999 रूपयांमध्ये उपलब्ध होईल. हा स्मार्टफोन केवळ एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. कंपनीनं फोन आइस कलर आणि क्रिमिक ब्लॅकमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनवर एचडीएफसी डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट केल्यास 2000 रूपयांचा कॅशबॅक मिळत आहे. यासोबतच फोनवर 10,100 रूपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. 

Nokia 6.2 स्पेसिफिकेशन 

नोकिया 6.2 स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 9 वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. जो गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसोबत येतो. नोकिया 6.2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्र्रॅगन 636 प्रोसेसर दिला आहे. जो 4 जीबी रॅम सपोर्टसोबत मिळेल. 

फोनमध्ये 3500 एमएएचची बॅटरी दिली आहे. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा लेंस 16 मेगापिक्सलचा आहे. या व्यतिरिक्त यात 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर मिळेल. फ्रंटमध्ये कंपनीनं 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. 

नोकिया 6.2 स्मार्टफोनमध्ये 64 जीबीचा स्टोरेज मिळेल. ज्यामुळे मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं 512 जीबीपर्यंत वाढवता येईल. फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट, 4G एलटीई, ब्लूटूथ 5.0 आणि रिअर फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी