आता प्रत्येक रुमसाठी AC घ्यायची गरज नाही, फक्त एक AC आणेल थंडावा

गॅजेट फिव्हर
Updated May 04, 2021 | 20:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

विंडो एअर कंडिशनर सेट करण्याच्या झंझटीपासून दूर राहू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोर्टेबल एअर कंडिशनरचा (Portable Air Conditioner) चांगला पर्याय आहे. याचा वापर करणे खूप सोपे असते.

Portable Air Conditioner
पोर्टेबल एअर कंडिशनर 

थोडं पण कामाचं

  • सर्व रुममध्ये एसी बसवण्याची गरज नाही
  • पोर्टेबल एअर कंडिशनर
  • वापरासाठी सोपा आणि सर्व घरात थंडावा

नवी दिल्ली : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. गरमी, उकाडा यामुळे सर्वच हैराण होत असतात. त्यातच शहरांमध्ये तर घर दाटीवाटीने असतात. त्यामुळे एअर कंडिशनर (Air Conditioner) लावण्याची आवश्यकता भासते. अर्थात यासाठी तुमच्याकडे विंडो एअर कंडिशनिंग, एअर कूलर आणि स्प्लिट एसी यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

एअर कंडिशनर

जर तुम्हाला घरात एअर कंडिशनिंग हवी असेल तर तुमचे घर थंड करण्यासाठी तीन पर्याय आहेत. सेंट्रल एअर कंडिशनिंग, विंडो एअर कंडिशनर आणि पोर्टेबल एअर कंडिशनर. जर तुम्ही विंडो एअर कंडिशनर सेट करण्याच्या झंझटीपासून दूर राहू इच्छित असाल तर तुमच्यासाठी पोर्टेबल एअर कंडिशनरचा (Portable Air Conditioner) चांगला पर्याय आहे. याचा वापर करणे खूप सोपे असते. शिवाय पोर्टेबल एअर कंडिशनर कुठेही नेता येतो आणि सेट करता येतो. म्हणजेच तुम्ही फक्त एक पोर्टेबल एअर कंडिशनर जरी विकत घेतला तरी याला सर्व घरात नेऊन तुम्ही याचा पुरेपूर वापर करू शकता आणि सर्व घर थंड करू शकता.

पोर्टेबल एअर कंडिशनर काम कसे करतो


सर्वसाधारणपणे पोर्टेबल एअर कंडिशनर सर्व रुमची हवा थंड करतो आणि याला सर्व रुममध्ये पसरवतो. याला जोडलेली तुमच्या खिडकीची एक ट्युब रुममधून गरम हवा बाहेर फेकते. यामुळे या युनिटला आद्रता राखण्यासही मदत होते. त्यानंतर तुम्ही फॅन स्पीड आणि टेंमरेचर  यासारख्या बाबींना कंट्रोल करू शकता.

पोर्टेबल एअर कंडिशनर खिडकी युनिट्ससाठी एक अतिरिक्त पर्याय आहेत. अर्थात यांना सेट करणे सोपे आहेत शिवाय सर्वसाधारणपणे हे जरा अधिक कॉम्पॅक्ट असतात. त्यामुळे तुम्हाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत यांना सहजपणे नेता येते. पोर्टेबल एअर कंडिशनर हे वापरासाठी अत्यंत सोपे असतात.

सर्वात चांगला पोर्टेबल एअर कंडिशनर


Frigidaire पोर्टेबल एअर कंडिशनर रिमोटसह येतो. यात एक टायमरचा पर्यायदेखील असतो. शिवाय यामध्ये dehumidifying आणि हवा सस्पेंशनची सुविधादेखील मिळते. हा एअर कंडिशनर तीन वेगवेगळे फॅन स्पीड देतो आणि ३५० चौ. फूटापर्यत खोलीला थंड करतो. या मॉडेलचे वजन जवळपास ६२ पौंड आहे आणि हा स्लीप मोडसह येतो. 

सर्वात स्वस्त पोर्टेबल एअर कंडिशनर


अॅमेझॉन बेसिक्सच्या नो-फ्रिल्स पोर्टेबल युनिट ४०० चौ. फूटांपर्यत खोली थंड करतो आणि दुसऱ्या मॉडेलच्या तुलनेत अधिक स्वस्त आणि हलका आहे. हा  पोर्टेबल एअर कंडिशनर रिमोट कंट्रोलसह एलईडी डिस्प्लेसोबत येतो.

पॉवर सेव्हिंग एअर कंडिशनर


ऑफिस केबिन आणि लहान खोलीसाठी एक ब्लू स्टार १ टन पोर्टेबल एसी लेटेस्ट सुविधांसह येतो. एसीचे हाय परफॉर्मन्सचा रोटरी कॉम्प्रेसर वीजेचा कमी वापर करतो आणि जास्त थंडावा देतो. 

सध्या बाजारात विविध गृहोपयोगी वस्तूंचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या बजेट आणि गरजेनुरूप योग्य उत्पादन तुम्ही निवडू शकता. शिवाय विविध कंपन्या आणि ई-कॉमर्स कंपन्या अनेक ऑफरदेखील बाजारात आणत असतात.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी