'पॉवर बँक' खरेदी करताना घ्या 'ही' काळजी

गॅजेट फिव्हर
Updated Jun 11, 2019 | 16:12 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Tips and Tricks: पावर बँक आपल्या स्मार्टफोनला एक्स्ट्रा बॅटरी उपलब्ध करुन देते. तुमच्यासाठी कुठली पॉवर बँक बेस्ट आहे हे तुम्ही तीन गोष्टींवरुन ओळखू शकता.

Power bank purchase tips
'पॉवर बँक' खरेदी करताना घ्या 'ही' काळजी  

मुंबई: स्मार्टफोनमुळे आपल्या आयुष्यात खूपकाही गोष्टी अगदी सहज आणि वेगाने होऊ लागल्या आहेत. मग कुणाला व्हिडिओ कॉल करायचा असो, एखादं डॉक्युमेंट, फोटो पाठवायचं असेल, फोटो किंवा व्हिडिओ शूट करणं असो अशा विविध गोष्टी अगदी सहज स्मार्टफोनच्या माध्यमातून केल्या जातात. मात्र, हे सर्व करता-करता आपल्या स्मार्टफोनची बॅटरी सुद्धा तितक्याच वेगाने संपते. स्मार्टफोनच्या बॅटरीची ही समस्या दूर करण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण पॉवर बँक वापरतात. 

पॉवर बँक आफल्या मोबाइलच्या बॅटरीला एक्स्ट्रा बॅटरी देते. बाजारात विविध कंपन्यांच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत. स्वस्त आणि मस्त पॉवर बँक खरेदी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण नेमकी कुठली पॉवर बँक खरेदी करायची असा प्रश्न अनेकदा ग्राहकांना पडतो. तुम्हालाही असाच प्रश्न पडलाय का? मग काळजी करु नका आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने तुम्ही बेस्ट पॉवर बँक खरेदी करु शकता. 

स्पेसिफिकेशन्स तपासा

पॉवर बँख खरेदी करण्यापूर्वी आपल्या गरजा आणि पॉवर बँकचे स्पेसिफिकेशन्स नक्की तपासा. सर्वातआधी हे ठरवा की, तुम्हाला किती mAh म्हणजेच अॅम्पिअरच्या बॅटरीची आवश्यकता आहे. आपल्या गरजेनुसार पॉवर बँक निवडली पाहिजे. सामान्य वापरासाठी तुम्हाला 1000 mAh पर्यंत क्षमता असलेल्या पॉवर बँकची आवश्यकता असते आणि त्यामुळे तशीच पॉवर बँक खरेदी करणं आवश्यक असतं.

Power Bank

पॉवर बँकची साइज

पॉवर बँकची साइज नेहमीच महत्वाची ठरते. जास्त मोठी साइज असलेली पॉवर बँक खरेदी करणं टाळा. कारण, मोठ्या साइजची पॉवर बँक हाताळणं किंवा कॅरी करणं हे खूपच कठीण होतं. बाजारात 4 इंचापासून ते 7 इंचापर्यंतच्या पॉवर बँक उपलब्ध आहेत. तुमच्या गरजेनुसार आणि सुविधेनुसार यापैकी एक पॉवर बँक तुम्ही निवडू शकता.

चार्जिंग इनपुट आणि आऊटपुट

बहुतेकजण हे पॉवर बँक खरेदी करताना केवळ mAh चा विचार करतात. त्यांना वाटतं की, ज्यास्त एमएएच क्षमता असलेली पॉवर बँक जास्त चांगली असते. मात्र, तसं नसतं. बहुतेक पॉवर बँक 1 अॅम्पिअर आऊटपुटसह येतात. एक फोन चार्ज करण्यासाठी एक आऊटपुट ठिक असतो. तर टॅबलेट चार्जिंगसाठी 2.1 अॅम्पिअर चार्जिंग असलेल्या पॉवर बँक चांगली असते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'पॉवर बँक' खरेदी करताना घ्या 'ही' काळजी Description: Tips and Tricks: पावर बँक आपल्या स्मार्टफोनला एक्स्ट्रा बॅटरी उपलब्ध करुन देते. तुमच्यासाठी कुठली पॉवर बँक बेस्ट आहे हे तुम्ही तीन गोष्टींवरुन ओळखू शकता.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola