Oneplus Pre-order booking: OnePlus Nordच्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात

गॅजेट फिव्हर
Updated Jul 30, 2020 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Oneplus कंपनीचा नवा स्मार्टफोन OnePlus Nordचे प्री-बुकिंगला (pre-booking) आजपासून सुरुवात झाली आहे. जाणून घेऊया या फोनच्या स्पेसिफिकेशन्स (specifications) आणि फीचर्सबद्दल (features).

OnePlus Nord smartphone
OnePlus Nordच्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात  

थोडं पण कामाचं

  • OnePlus Nord अॅमेझॉनवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे
  • जाणून घ्या OnePlus Nord प्री-ऑर्डर आणि फीचर्स
  • प्री-ऑर्डर करण्याआधी जाणून घ्या याचे फीचर्स

मुंबई: Oneplusचा सर्वात स्वस्त फोन OnePlus Nord अॅमेझॉनवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. ग्राहक प्री-ऑर्डर फक्त 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी करू शकतील. हा एक 5G फोन आहे, जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 765 G प्रोसेसरद्वारे संचालित आहे. कंपनीने नवीन लॉंच केलेल्या स्मार्टफोनच्या तीन व्हेरिएंटची घोषणा केली आहे. बेस मॉडेल 64GB स्टोरेजसह 6 GB रॅम ज्याची किंमत २४,९९९ रुपये आहे. दुसरा व्हेरिएंट 128 GB इंटर्नल स्टोरेजसह 8 GB रॅमचा आहे, ज्याची किंमत २७,९९९ रुपये आहे. यासोबतच 12 GB रॅमचेही एक मॉडेल आहे, ज्याची किंमत २९,९९९ रुपये एवढी आहे. 6 GB व्हेरिएंट यावर्षी सप्टेंबरमध्ये बाजारात येईल. इतर दोन 8 GB  आणि 12 GB चे व्हेरिएंट ४ ऑगस्ट रोजी सेलमध्ये विकण्यात येईल.

OnePlus Nord प्री-ऑर्डर आणि ऑफर्स

OnePlus Nordच्या पहिल्या सेलची सुरुवात 4 ऑगस्टपासून होईल. या स्मार्टफोनचे प्री-बुकिंग या कंपनीच्या संकेतस्थळावर नाही, तर Amazon.comवर करता येईल. सोबतच प्री-ऑर्डरवर ऑफर्सही दिल्या जात आहेत. अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर 2000 रुपयांची सवलत, 100 रुपयांची इन्संट सवलत, 12,400 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर यासोबतर काही निवडक कार्डांवर नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही सामील आहे. याशिवाय आपल्याला एचएसबीसी कॅशबॅक कार्डवर 5 टक्क्यांपर्यंतची सवलत देण्यात येईल.

OnePlus Nordचे फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 2400*1080 pixels रेजोल्यूशनसह 6.44 इंचांचा AMOLED डिस्प्ले आहे. सोबतच यात 20:9 आस्पेक्ट रेशियो, 90Hz रीफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. हा फोन एड्रेनो 620 जीपीयूसह क्वालकॉम स्नेपड्रॅगन 765 जी 5 जी प्रोसेसरद्वारे संचालित आहे. याशिवाय यात रीडिंग मोड, नाईट मोड आणि व्हीडियो एनहान्सर यासारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 12 जीबीपर्यंत LPDDR4*RAM देण्यात आले आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी