भारतातला पहिला 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर

India's first 5G smartphone: चिनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी रियलमी भारतात पहिला 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत.

Realme 5G smartphone
भारतातला पहिला 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबईः चिनी स्मार्टफोन निर्माता रियलमीद्वारे सादर करणारा भारताचा पहिला 5जी हॅंडसेटची किंमत जवळपास 50000 रूपये असणार आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यानं दावा केला आहे की, 2018 मध्ये अस्तित्त्वात आल्यानंतर रियलमी भारतात 5G स्मार्टफोनचं लॉन्च करणारा पहिला ब्रॅड बनण्यासाठी तयार आहे. त्यांनी म्हटलं की, दरम्यान देशात नेटवर्क उपलब्ध नाही आहे. मात्र कंपनी भारतात 24 फेब्रुवारीला 5G फोन सादर करण्यासाठी तयार आहे. 

नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकारी यांनी सांगितले की, रियलमी 5G हँडसेटमध्ये 865 स्नॅपड्रॅगन चिपसेट असेल आणि येथे 50,000 रूपयांच्या जवळपास उपलब्ध होईल. मोबाइल फोनसेटच्या माहिती देणारी एक  वेबसाइटचा असा अंदाज आहे की, बाजारात कमी क्षमता चिपसेट आवृत्तीत 25,790 रूपयांच्या जवळपास उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

रियलमी आपला पहिली 5G स्मार्टफोन रियलमी एक्स 50 प्रो भारतात 24 फेब्रुवारीला लॉन्च करणार आहे. रियलमी एक्स 50 प्रोच्या लॉन्च इनविटेशननुसार, फोन नवी दिल्लीत लॉन्च केला जाईल आणि इव्हेंटची लाईव्ह स्ट्रीमिंग दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. रियलमी चीनचे चीफ मार्केटिंग ऑफिसर शू की चेस यांनी सांगितलं होतं की, हा एक्स 50 प्रो स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 856 सोबत येतो. यासोबतच एक्स 50 प्रोमध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GBपर्यंत UFC  3.0 स्टोरेज दिला जाऊ शकतो.

एक्स 50 प्रो डिव्हाइस अॅन्ड्रॉईंड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. एक्स 50 प्रो फोन 65 वॉटच्या सुपर डार्ट चार्ज टेक्नॉलॉडीसोबत येतो. कंपनीचा हा फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. रियलमीचा फ्लॅगशिप फोन एक्स 50 प्रो 90 हर्टज रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसोबत येतो. 

आतापर्यंत समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, एक्स 50 फोनमध्ये 6 कॅमेरे असण्याची शक्यता आहे. यात 64 मेगापिक्सलचा क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. एक्स 50 प्रो फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा ड्यूअल सेल्फी कॅमेरा असू शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी