Redmi 8: शाओमीनं लॉन्च केला कमी किंमतीतला स्टायलिश आणि दमदार स्मार्टफोन रेडमी 8 

Redmi 8 Price: शाओमीनं भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ज्याची किंमत कमी आणि आकर्षक डिझाईन, फिचरसोबत ग्राहकांना मिळेल. जाणून घ्या रेडमी 8 ची किंमत आणि फिचर.

Redmi 8
Redmi 8: शाओमीनं लॉन्च केला कमी किंमतीतला स्टायलिश आणि दमदार स्मार्टफोन रेडमी 8   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • शाओमीनं एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
  • जो रेडमी 8 सीरिजचा भाग आहे. दिवाळीच्या आधी शाओमीनं शानदार डिझाईन आणि आकर्षक फिचरसोबत हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
  • फोनमध्ये 5000 एमएएचच्या बॅटरीचा चांगला पर्याय देखील आहे. 

मुंबईः  शाओमीनं एन्ट्री लेव्हल सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जो रेडमी 8 सीरिजचा भाग आहे. दिवाळीच्या आधी शाओमीनं शानदार डिझाईन आणि आकर्षक फिचरसोबत हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. रेडमी 8 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप, गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आणि 8 मेगापिक्सल KAI फिचर असलेल्या फ्रंन्ट कॅमेऱ्यासोबत येईल. फोनमध्ये 5000 एमएएचच्या बॅटरीचा चांगला पर्याय देखील आहे. 

शाओमी रेडमी 8 ची किंमत आणि उपलब्धता

शाओमीनं रेडमी 8 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट- 3 जीबी रॅम 32 जीबी स्टोरेज आणि 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोनचा 3 जीबी रॅम व्हेरिएंट 7,999 रूपये किंमतीला येईल. तर 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 8,999 रूपये आहे. भारतात शाओमी स्मार्टफोनची विक्री 10 कोटींच्या पार पोहोचली असल्याच्या आनंदानं कंपनी सुरूवातीचे 50 लाख यूनिट्सच्या 4 जीबी रॅम व्हेरिएंट देखील 7,999 रूपयांना विकेल. 

रेडमी 8 स्मार्टफोनची विक्री 12 ऑक्टोबरपासून मी डॉट कॉम, फ्लिपकार्ट आणि मी होम स्टोरवर सुरू होईल. शाओमीनं यासोबतच 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन देखील टीज केला आहे आणि याच्याशी संबंधित कंपनी 16 ऑक्टोबरला घोषणा करेल. 

Redmi 8 स्पेसिफिकेशन 

शाओमी रेडमी 8 स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्लेसोबत येईल. ज्यावर गोरिल्ला ग्लास 5चं प्रोटेक्शन मिळेल. हा स्मार्टफोन ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसरवर काम करतो. जो 4 जीबीपर्यंतच्या रॅम सपोर्टसोबत मिळणार आहे. 

रेडमी 8 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो 12 मेगापिक्सलच्या सोनी आयएमएक्स 363 प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेंसरसोबत येईल. फोनमध्ये रिअर कॅमेरा सेटअप दिल आहे. जो पोको एफ 1 आणि मी मिक्स 2 एस उपलब्ध आहे. फ्रंटमध्ये कंपनीनं 8 मेगापिक्सलचा एआय फिचर असलेला कॅमेरा दिला आहे. जो फेस अनलॉकच्या फिचरसोबत येईल. 

फोनचं स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं 512 जीबी पर्यंत वाढवू शकतो. क्नेक्टिव्हिटीसाठी यात 4जी वोएलटीई, वायफाय, जीपीएस, वायरलेस एफएम, 3.5 एफएएचची बॅटरी आहे. जी 18 वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. दरम्यान बॉक्समध्ये शाओमीनं 10 वॉटचा चार्जरही दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...