Redmi Note 8 Pro: शाओमीचा रेडमी नोट 8 Proचं नवं व्हेरिएंट लॉन्च, जाणून घ्या किंमत 

Redmi Note 8 Pro New Variant: शाओमीनं रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोनचा नवं व्हेरिएंट लॉन्च करण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन आता इलेक्ट्रिक ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल.

Redmi Note 8 Pro
Redmi Note 8 Pro: शाओमीचा रेडमी नोट 8 Proचं नवं व्हेरिएंट लॉन्च, जाणून घ्या किंमत  

थोडं पण कामाचं

  • शाओमीनं काही दिवसांपूर्वीच रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोनचा आणखी एक व्हेरिएंट लॉन्च केला आहे.
  • शाओमी रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोनचा इलेक्ट्रिक ब्लू ग्रेडिएंट डिझाईनं असलेलं व्हर्जन लॉन्च झालं आहे.
  • ज्यात फिचरमध्ये काही बदल केले नाही आहेत.

मुंबईः शाओमीनं काही दिवसांपूर्वीच रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोनचा आणखी एक व्हेरिएंट लॉन्च केला आहे. शाओमी रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोनचा इलेक्ट्रिक ब्लू ग्रेडिएंट डिझाईनं असलेलं व्हर्जन लॉन्च झालं आहे. ज्यात फिचरमध्ये काही बदल केले नाही आहेत. रेडमी नोट 8 प्रोवर इलेक्ट्रिक ब्लू पेंट जॉब जास्तप्रमाणात डीप सी ब्लू कलरसारखा वाटतो. जो कंपनीनं तैवानमध्ये लॉन्च केला आहे. रेडमी नोट 8 प्रोचा इलेक्ट्रिक ब्लू कलर व्हेरिएंट आता उपलब्ध झाला आहे. 

Redmi Note 8 Pro price in India

रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोन 14,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीला उपलब्ध आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनचा 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रूपये येतो. फोनचं टॉप व्हेरिएंट 8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रूपयांच्या किंमतीत येईल. शाओमी द्वारे दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन मी डॉट कॉम आणि अॅमेझॉनवर उपलब्ध होईल.

Redmi Note 8 Pro specifications 

रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 10 वर आधारित मीयूआय 10 वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी प्लस एचडीआर डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन ऑक्टाकोर मीडियाटेक हीलिओ G90T प्रोसेसरवर काम करतो. जो 8 जीबीपर्यंत रॅमसोबत येतो. फोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18 वॉटचा चार्जिंग सपोर्ट देते.

शाओमीनं या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस दिली आहे. फ्रंटमध्ये कंपनीनं 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोन रिअर फिंगरप्रिंट सेंसर दिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी