Redmi Note 8 आणि  Redmi 8 Pro चा सेल, या किंमतीत मिळेल स्मार्टफोन

Redmi Note 8 Pro Price: रेडमी नोट 8 सीरिजचा आज पहिल्यांदा सेल आहे. शाओमीचे दोन स्मार्टफोन रेडमी नोट 8 आणि रेडमी नोट 8 प्रो खरेदी केला जाऊ शकणार आहे. जाणून घ्या किंमत, फिचर आणि कुठे मिळेल फोन. 

Redmi Note 8 Pro Sale
Redmi Note 8 आणि  Redmi 8 Pro चा सेल, या किंमतीत मिळेल फोन 

थोडं पण कामाचं

 • रेडमीनं नोट 8 सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लॉन्च केले.
 • दोन्ही ही स्मार्टफोनची हा पहिला सेल आहे.
 • हे दोन्हीही स्मार्टफोन अॅमेझॉन डॉट इन, मी डॉट कॉम आणि मी होम स्टोरमधून खरेदी करू शकणार आहेत.

मुंबईः रेडमीनं नोट 8 सीरिजचे दोन नवे स्मार्टफोन काही दिवसांपूर्वीच लॉन्च केले. दोन्ही ही स्मार्टफोनची हा पहिला सेल आहे. जो आज दुपारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला 12 वाजता सुरू होणार आहे. हे दोन्हीही स्मार्टफोन अॅमेझॉन डॉट इन, मी डॉट कॉम आणि मी होम स्टोरमधून खरेदी करू शकणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये आकर्षक डिझाइन आणि क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. या डिव्हाईसमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. 

Redmi Note 8 Pro, Redmi Note 8 price in India

रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोन भारतात 14,999 रूपयांच्या सुरूवातीत किंमतीला येईल. ही किंमत स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनचा 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रूपयांच्या किंमतीला येईल. तसंच स्मार्टफोनचा टॉप व्हेरिएंट म्हणजेच 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रूपयांमध्ये येईल. 

दुसरीकडे रेडमी नोट 8 स्मार्टफोन 9,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीत येतो. ही किंमत स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची आहे. फोनचा 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रूपयांच्या किंमतीवर येतो. हा फोन मूनलाइट व्हाइट, नेप्चून ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. 

Redmi Note 8 Pro specifications, features

 • डिस्प्ले - 6.53 इंचाचा फुल एचडी स्क्रिन 
 • ऑपरेटिंग सिस्टम- अॅन्ड्रॉईडवर आधारित मीयूआय 10 ओएस मिळेल.
 • प्रोसेसर- ऑक्टाकोर मीडियाटेक हीलियो जी90 टी प्रोसेसर 
 • रॅम- 8 जीबीपर्यंत
 • कॅमेरा- क्वॉड रिअर कॅमेरा (64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि दोन 2 मेगापिक्सलची लेंस) फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा 
 • बॅटरी- 4500 एमएएच ( 18 वॉटचा चार्जर) 
 • अन्य फिचर- 3.5 एमएम जॅक, ब्लूटूथ 5.0, आयआर ब्लास्टर, यूएसबी टाइप सी, रिअर फिंगरप्रिंट सेंसर 

Redmi Note 8 specifications, features

 • डिस्प्ले 6.39 इंचाचा फुल एचडी स्क्रिन 
 • ऑपरेटिंग सिस्टम- अॅन्ड्रॉईडवर आधारित मीयूआय 10 ओएस मिळेल.
 • प्रोसेसर- ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर 
 • रॅम- 6 जीबी 
 • स्टोरेज- 128 जीबी 
 • कॅमेरा- क्वॉड रिअर कॅमेरा (48 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, दोन 2 मेगापिक्सलची लेंस) फ्रंटमध्ये 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा 
 • बॅटरी- 4000 एमएएच
 • अन्य फिचर- 3.5 एमएम जॅक, ब्लूटूथ 5.0, आयआर ब्लास्टर, यूएसबी टाइप सी, रिअर फिंगरप्रिंट सेंसर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी