शाओमीचा Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro लॉन्च, जाणून घ्या किंमत 

Redmi Note 8 Pro Price: शाओमीनं रेडमी नोट 8 प्रो आणि रेडमी नोट 8 (Redmi Note 8) स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोनची किंमत आणि फिचर. 

Redmi Note 8 Pro Price
शाओमीचा Redmi Note 8 आणि Redmi Note 8 Pro लॉन्च, जाणून घ्या किंमत  

थोडं पण कामाचं

  • शाओमीनं भारतात रेडमी नोट 8 सीरिज लॉन्च केला आहे.
  • कंपनीनं या सीरिजच्या अंतर्गत दोन स्मार्टफोन रेडमी नोट 8 आणि रेडमी नोट 8 प्रो लॉन्च केला आहे.
  • शाओमीनं या इव्हेंटमध्ये मी एयर प्यूरीफायर आणि मीयूआय 11 लॉन्च केला.

शाओमीनं भारतात रेडमी नोट 8 सीरिज लॉन्च केला आहे. कंपनीनं या सीरिजच्या अंतर्गत दोन स्मार्टफोन रेडमी नोट 8 आणि रेडमी नोट 8 प्रो लॉन्च केला आहे. यासोबतच शाओमीनं या इव्हेंटमध्ये मी एयर प्यूरीफायर आणि मीयूआय 11 लॉन्च केला. दोन्ही स्मार्टफोन क्वॉड कॅमेरा फिचरसोबत येतो. दोन्ही कॅमेरा सेटअपमध्ये फरक आहे. यासोबतच दोघांचा प्रोसेसर वेगळा आहे. जिथे रेडमी नोट 8 मध्ये मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. नोट 8 प्रोमध्ये मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. 

Redmi Note 8 आणि  Redmi Note 8 Pro Price

रेडमी नोट 8 स्मार्टफोन 9,999 रूपये सुरूवातीच्या किंमतीवर लॉन्च झाला आहे. ही किंमत फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 12,999 रूपयांमध्ये येतो. स्मार्टफोनची पहिली सेल 21 ऑक्टोबरला होईल. हा फोन अॅमेझॉन इंडिया, मी डॉट कॉम आणि मी होम स्टोरमधून खरेदी केला जाऊ शकता. 

रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोन 14,999 रूपये सुरूवातीच्या किंमतीवर लॉन्च झाला. ही किंमत स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची आहे. फोनचा 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रूपये आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रूपये किंमतीवर मिळेल. हा स्मार्टफोन गामा ग्रीन, हॅलो व्हाईट आणि शॅडो ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. हा फोन तुम्ही 21 ऑक्टोबरला मी डॉट कॉम, अॅमेझॉन इंडिया आणि मी होम स्टोरमधून खरेदी करू शकता. 

Redmi Note 8 specifications

ड्युअल सिम सपोर्ट असलेला रेडमी नोट 8 स्मार्टफोन 6.39 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्लेसोबत येतो. फोनचा फ्रंट आणि रिअर दोन्ही आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आहे. यात वॉटप ड्रॉप नॉच फ्रंट दिला आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरवर काम करतं. जो 6 जीबीपर्यंत रॅम सपोर्टसोबत येईल. फोनचं स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं 512 जीबीपर्यंत वाढवण्यात येऊ शकतं. 

रेडमी नोट 8 मध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य लेंस, 8 मेगापिक्सलचं वाइड एंगल लेंस आणि दोन 2 मेगापिक्सलचा लेंस देण्यात आली आहे. फ्रंटमध्ये कंपनीनं 13 मेगापिक्सलाचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. 18 वॉटची चार्जिंग सपोर्ट असलेल्या फोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. टाइप सी, 3.5 एमएमचा ऑडिओ जॅक आणि आयआर ब्लास्टर दिला आहे. 

Redmi Note 8 Pro specifications

ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन फ्रंट आणि रिअर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी90 टी प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 8 जीबी पर्यंत रॅम सपोर्टसोबत येतो. या फोनमध्ये लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी देखील दिली आहे. स्मार्टफोनमध्ये गेम टर्बो 2.0 मोड सुद्धा दिला आहे. 

रेडमी नोट 8 प्रो स्मार्टफोनमध्ये चार रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात एक 64 मेगापिक्सलचा मुख्य लेंस दिला आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल आणि दोन 2 मेगापिक्सलची लेंस दिली आहे. फ्रंटमध्ये कंपनीनं 20 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 18 वॉटच्या चार्जिंग सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये टाइप सी, 3.5 एमएम जॅक आणि यात डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी