Independence Day Jio Offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त जिओची जबरदस्त ऑफर, 5 महिने फ्री डेटा आणि बरंच काही

Reliance Jio independence day offer: स्वातंत्र्यदिनानिमित्त आज रिलायन्स जिओने एक जबरदस्त ऑफर आणली आहे. JioFi खरेदी केल्यावर कॉल्स आणि डेटा फ्री मिळणार आहे. जाणून घ्या काय आहे ही ऑफर...

Reliance jio independence day offer
JioWi ऑफर (फोटो सौजन्य: www.jio.com) 

मुंबई: रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनीने स्वातंत्र्य दिनानिमित्त एक जबरदस्त ऑफर (Independence Day Offer) लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत जिओ JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट (JioFi 4G Device) खरेदी केल्यास ग्राहकांना पाच महिने मोफत डेटा मिळणार आहे. यासोबतच जिओ टू जिओ कॉलिंगची सुविधा फ्री मिळणार आहे. जिओफायची किंमत 1,999 रुपये इतकी आहे. जिओने दिलेल्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना जिओफाय कनेक्शन खरेदी केल्यावर एखादे प्लान अॅक्टिव्हेट करवे लागणार आहे. 

कुठे मिळेल जिओफाय हॉटस्पॉट (JioWi Hotspot)

रिलायन्स डिजिटल स्टोअर (Reliance Digital Store) मधून तुम्ही जिओफाय हॉटस्पॉट खरेदी करु शकता. जिओफाय खरेदी केल्यावर तुम्हाला जिओ सिम अॅक्टिव्हेट करावं लागणार आहे. ज्यासाठी तुम्हाला तीन जिओफाय प्लान्सपैकी एक प्लान निवडावा लागेल. जिओफाय डिव्हाइसमध्ये सिम टाकल्यावर तुम्ही जो प्लान निवडाल तो प्लान पुढील एका तासात सुरू होईल. हे प्लान अॅक्टिव्हेट झालं आहे की नाही हे स्टेटस तुम्ही MyJio App मध्ये सुद्धा पाहू शकता. जिओफाय डिव्हाइस तुम्ही रिलायन्स डिजिटल स्टोअर्स सोबतच ऑनलाईन माध्यमातूनही खरेदी करु शकता जे कंपनीच्या साईटवर उपलब्ध आहे.

जिओफायचा सर्वात स्वस्त प्लान

जिओफायचा सर्वात स्वस्त प्लान हा 199 रुपयांचा आहे. या प्लानमध्ये तुम्हाला प्रति दिवस 1.5GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. याव्यतिरिक्त तुम्ही अतिरिक्त 99 रुपये देवून Jio Prime मेंबरशिप सुद्धा मिळवू शकता. ज्यामध्ये तुम्हाला प्रतिदिन 1.5GB डेटा, अनलिमिटेड जिओ-टू-जिओ कॉल्स, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतात. तर 100 नॅशनल एसएमएस (SMS)ची सुविधा 140 दिवसांसाठी मिळते. 

जिओफायचा 249 रुपयांचा प्लान

जिओफायचा दुसरा प्लान हा 249 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला प्रतिदिन 2GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. याव्यतिरिक्त तुम्ही अतिरिक्त 99 रुपये देत Jio Prime मेंबरशिप मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला प्रतिदिन 2GB डेटा, अनलिमिटेड जिओ-टू-जिओ कॉल्स, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतात. तर 100 नॅशनल एसएमएस (SMS)ची सुविधा 112 दिवसांसाठी मिळते. 

जिओफायचा 349 रुपयांचा प्लान

जिओफायचा तिसरा प्लान हा 349 रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला प्रतिदिन 3GB डेटा 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतो. याव्यतिरिक्त तुम्ही अतिरिक्त 99 रुपये देत Jio Prime मेंबरशिप मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला प्रतिदिन 3GB डेटा, अनलिमिटेड जिओ-टू-जिओ कॉल्स, इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स 28 दिवसांच्या वैधतेसह मिळतात. तर 100 नॅशनल एसएमएस (SMS)ची सुविधा 84 दिवसांसाठी मिळते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी