२७ हजारात मिळणारा 5G स्मार्टफोन रिलायन्स जिओ देणार अवघ्या २५०० रुपयात

Jio 5G smartphone Price: रिलायन्स जिओने 4G नंतर 5G स्मार्टफोन बाजारात आणण्याची तयारी केली आहे. कंपनीचा हा फोन ग्राहकांना अवघ्या 2500 ते 3000 रुपयांमध्ये मिळू शकतो. 

reliance jio
रिलायन्स जिओ  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रिलायन्स जिओ 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा 5जी स्मार्टफोन बाजारात लाँच करणार
  • 2G वापरणाऱ्या यूजर्ससाठी मोठा फायदा होणार
  • जिओ ही भारतातील यूजर्ससाठी विनामूल्य 4जी मोबाइल फोन बाजारात आणणारी पहिली कंपनी आहे

Jio 5G Phone Price in India: भारतात मोबाइल फोन इंटरनेटची क्रांती घडवून आणणारी कंपनी रिलायन्स जिओने (Jio) K4G नंतर आता 5G मध्ये क्रांती आणण्याची तयारी सुरू केली आहे. लोकांना अगदी कमी किंमतीत म्हणजेच केवळ २५०० ते ३००० रुपयांमध्ये  5G स्मार्टफोन जिओ देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या भारतात 5G स्मार्टफोनची किंमत २७००० रुपयांपासून सुरू होते. रिलायन्स जिओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 5G स्मार्टफोन 5 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात आणण्याची योजना आखत आहे आणि याच्या विक्रीत वाढ झाल्यास याच्या किंमतीत घट करुन तो २५०० ते ३००० रुपयांमध्ये उपलब्ध करुन दिला जाईल. या उपक्रमांतर्गत कंपनी सध्या 2G कनेक्शन वापरत असणाऱ्या २० ते ३० कोटी यूजर्संना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, कंपनी जिओच्या या फोनची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी ठेऊ इच्छिते. जेव्हा आम्ही विक्री वाढवू तेव्हा त्याची किंमत २,५००-३००० रुपये असू शकते. दरम्यान, रिलायन्स जिओने या संदर्भात पाठविलेल्या ईमेलला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

जिओ ही भारतातील यूजर्ससाठी विनामूल्य 4जी मोबाइल फोन बाजारात आणणारी पहिली कंपनी आहे. याअंतर्गत जिओला फोनसाठी 1,500 रुपये द्यावे लागले, जे नंतर परत दिले जाऊ शकतात.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये (एजीएम)  भारताला 2G मुक्त (2 जी कनेक्शनपासून मुक्त) बनविण्यावर भाष्य केले होते आणि स्वस्त 5G स्मार्टफोन बनविण्याबाबत वक्तव्य केलं होतं. 

कंपनी आपल्या 5जी नेटवर्क उपकरणांवर देखील काम करत आहे आणि या उत्पादनांच्या चाचणीसाठी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यास डीओटीला सांगितले आहे. रिलायन्स जिओच्या विनंतीबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सध्या भारतात 5जी सेवा नाही आणि सरकारने 5जी तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी दूरसंचार ऑपरेटरला स्पेक्ट्रमचे वाटप केलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी