Samsung: ४८ मेगापिक्सेलनंतर आता लाँच होणार ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन

गॅजेट फिव्हर
Updated May 09, 2019 | 14:34 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Samsung mobile: ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असलेला स्मार्टफोन गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मात्र आता लवकरच ६४ मेगापिक्सेल सेन्सरवाला स्मार्टफोन तुमच्या भेटीला येणार आहे.

samsung mobile
सॅमसंग मोबाईल  |  फोटो सौजन्य: Getty Images

मुंबई:  बाजारात ४८ मेगापिक्सेल सेन्सरवाले स्मार्टफोन वेगाने लाँच होत आहेत. जवळजवळ सर्वच मोठ्या कंपन्या या कॅमेरा सेन्सॉरसह आपला फोन लाँच करत आहे. लवकरच आपल्याला ४८ मेगापिक्सेलपेक्षाही अधिक पिक्सेलचा कॅमेरा सेन्सर असलेला स्मार्टफोन भेटीला येऊ शकतो. सॅमंसगने मोबाईल फोन्ससाठी नव्या इमेज सेन्सरची घोषणा केली आहे. सध्या बाजारात असलेल्या  इतर मोबाईल लेन्सच्या तुलनेत जास्त रेझोल्युशन आहे.

ISOCELL right GW1 एक ६४ मेगापिक्सेल सेन्सर आहे, यात ०.८ मायक्रोमीटर आहे. सॅमसंगच्या सध्याच्या ४८ मेगापिक्सेल  सेन्सारचा आकारही इतकाच आहे. याचा अर्थ हा एक मोठा सेन्सर असेल जो जास्त लाईट कॅप्चर करू शकेल. हा तसाच काम करतो जसे ४८ मेगापिक्सेलचा सेन्सर १२ मेगापिक्सेलची फोटो डिफॉल्ट घेतो. 

सॅमसंगच्या नव्या सेन्सप कलर फिल्टर चांगल्या प्रकाशात ६४ मेगापिक्सेलचा शॉट घेऊ शकतो. सोनीच्या IMX586 48 मेगापिक्सेल सेन्सरमध्येही अशा क्षमता आहेत. मात्र सॅमसंगचा ४८ मेगापिक्सेलचा सेन्सर हे करू शकत नाही. यानंतर कोरियन कंपनीने आपल्या ४८ मेगापिक्सेल सेन्सरसाठी अपडेटची घोषणा केली आहे. यात हे फीचर जोडले जाईल. 

samsung

विशेष म्हणजे, ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा स्मार्टफोन मिळणे आता सामान्य गोष्ट झाली आहे. सॅमसंग, ह्युआवे, ओप्पो, विवो, श्योमी आणि अन्य स्मार्टफोन निर्माता कपनी ४८ मेगापिक्सेल सेन्सरवाले स्मार्टफोन लाँच करत आहेत. सॅमसंगला आशा आहे की त्यांचा ६४ मेगापिक्सेल असलेला स्मार्टफोन या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत होऊ शकतो. जर असे झाले तर या वर्षाच्या अखेरपर्यंत तुम्हाला ६४ मेगापिक्सेल सेन्सरवाला स्मार्टफोन तुम्हाला दिसू शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Samsung: ४८ मेगापिक्सेलनंतर आता लाँच होणार ६४ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन Description: Samsung mobile: ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असलेला स्मार्टफोन गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मात्र आता लवकरच ६४ मेगापिक्सेल सेन्सरवाला स्मार्टफोन तुमच्या भेटीला येणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola