[VIDEO] Sex Robot: चालत्या बोलत्या सेक्स रोबोटचा लवकरच सेल

गॅजेट फिव्हर
Updated Nov 03, 2019 | 12:58 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Sex Robot: बाजारात आता अशा प्रकारचे विविध रोबोट येत आहेत जे केवळ मनुष्याप्रमाणे दिसत नाहीत तर कामही करतात. हे रोबोट मनुष्याप्रमाणे बोलतात, श्वास करतात आणि कामही करत असल्याचं पहायला मिळत आहे. 

sex robot relationship talk walk technology business news marathi
(प्रातिनिधीक फोटो)  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • सेक्स रोबोटची निर्मिती
  • रोबोटमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर
  • मनुष्याप्रमामे चालणार, बोलणार आणि कामंही करणार
  • रोबोट लवकरच विक्रीसाठी बाजारात

सेक्स रोबोट आता केवळ फिक्शनल चित्रपटांत किंवा काल्पनिक कहाण्यांपर्यंतच सिमित नाहीयेत. आजच्या काळात हे रोबोट खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत आणि दिवसेंदिवस हे रोबोट आणखी आधुनिक होत आहेत. तंत्रज्ञान आता अशा ठिकाणी पोहोलं आहे जेथे सेक्स रोबोट केवळ मनुष्याप्रमाणे दिसत नाहीत तर त्यांच्याप्रमाणे बोलतात आणि कामही करतात. इतकंच नाही तर हा रोबोट श्वासही घेत असल्याचं वृत्त आहे.

यूके मिररच्या रिपोर्टनुसार, एक सेक्स रोबोट फर्मने दावा केला आहे की, ते असा एका सेक्स रोबोट तयार करत आहेत जो श्वास घेऊ शकतो तसेच चालू शकतो आणि बोलू सुद्धा शकतो. AI-AITech च्या यूके एजेंट क्लाउड क्लायमेक्सच्या मते, 'एम्मा' नावाच्या एखा सेक्स रोबोटची ते निर्मिती करत आहेत ही रोबो अक्षरश: मनुष्याप्रमाणे दिसते. 

डेली स्टारसोबत बोलताना, क्लाउड क्लायमेक्स मॅनेजर सॅम व्हाइट यांनी सांगितले, "एम्मा आप्या हालांची हालचाल करण्यास सक्षम असेल आणि ती श्वासही घेऊ शकेल. तसेच एम्मा आपल्या पायांच्या सहाय्याने चालण्यास सक्षम असणार आहे".

एम्मा या रोबोटचं सध्याचं वर्जन २,७९९ यूरो म्हणजेच जवळपास २ लाख २० हजार (भारतीय रुपये) इतक्या किमतीत विक्री होत आहे. या रोबोमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आहे आणि रोबो आपल्या मालकासोबत बोलू शकणार आहे. इतकंच नाही तर या रोबोच्या चेहऱ्यावर भाव आणि पापण्या सुद्धा हलतील असे फिचर्स असणार आहेत. लवकरचही रोबोट तयार होऊन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

सेक्स रोबोट्स आणि गॅजेट्सचं जगभरात एख मोठं बाजार आहे जे मो्या वेगाने वाढतही आहे. या सर्वांची मागणी वाढत असल्याने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन रोबोट तयार केले जात आहेत. नव्या क्षमतेचे हे रोबो सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...