1 एप्रिलपासून LED TV खरेदी महागणार, जाणून घ्या कारण

TV Price hike: नागरिकांना महागाईचा फटका सर्वच बाजूने बसत आहे. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढीनंतर आता टीव्हीच्या किमतीही वाढणार आहेत.

LED TV Prices
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : गेल्या एक महिन्यापासून ओपन-सेल पॅनल्सच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आता एलईडी टीव्हीच्या किमतीवर होणार असल्याचं दिसत आहे. रिपोर्ट्सनुसार, 1 एप्रिल 2021 पासून भारतात एलईडी टीव्हीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. ओपन-सेल पॅनल्सच्या किमती जागतिक पातळीवर तब्बल 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. यापूर्वीच काही कंपन्यांनी एलईडी टीव्हीच्या किमती वाढवल्या आहेत तर इतर काही कंपन्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. (tv prices likely to increase from April 2021 know the reason)

रिपोर्ट्सनुसार, एलजी, सॅमसंग सारख्या कंपन्यांनी यापूर्वीच आपल्या प्रोडक्ट्सच्या किमती वाढवल्या आहेत. तर थॉमसन, पॅनासोनिक सारख्या कंपन्या त्यांच्या एलईडी टीव्हीच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. 

पॅनासोनिक इंडिया अँड साऊथ एशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शर्मा यांनी सांगितले की, पॅनलच्या किमती सतत वाढत आहेत. एप्रिलपर्यंत टीव्हीच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. किमती वाढी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, सध्याचा ट्रेंड पाहता एप्रिल महिन्यात टीव्हीच्या किमतीमध्ये 5-7 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

त्याचप्रमाणे हायर अप्लायन्स इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रॅग्झा म्हणाले की, किमती वाढविण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाहीये. ओपन-सेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. जर ही वाढ कायम राहिली तर आम्हालाही किमतीत वाढ करावी लागेल. ओपन-सेल पॅनल टीव्ही निर्मितीमधील एक महत्वाचा भाग आहे. कंपन्या ओपन-सेल स्थितीत टीव्ही पॅनल्स आयात करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी