Samsung Galaxy S10 Lite या दिवशी भारतात होणार लॉन्च, मिळणार हे दमदार फिचर

Samsung Galaxy S10 Lite Launch Date: सॅमसंग आपला नवीन स्मार्टफोन या महिन्यात भारतात लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. 

Samsung Galaxy S10 Lite
Samsung Galaxy S10 Lite या दिवशी भारतात होणार लॉन्च, मिळणार हे दमदार फिचर 

सॅमसंग गॅलेक्सी S10 लाइट स्मार्टफोन गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सॅमसंग हा स्मार्टफोन आता लॉन्च करणार आहे. कंपनीनं हा फोन फ्लिपकार्टवर टीज करण्यास सुरूवात केली आहे. फ्लिपकार्टवर कंपनीच्या टीझरनुसार, हा स्मार्टफोन 23 जानेवारीला भारतात लॉन्च होणार. सॅमसंगनं हा फोन 2020 मध्ये लॉन्च केला. फोनच्या टीझरनुसार, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल, जो 8 जीबी रॅम सपोर्टसोबत येईल. या अतिरिक्त फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप सुद्धा असणार आहे. 

Samsung Galaxy S10 Lite India launch date, price

फ्लिपकार्टवरून सॅमसंगनं या स्मार्टफोनचं वेगळं पेज जारी केलं आहे. ज्यावर फोनची लॉन्चिंग डेट सुद्धा कंफर्म झाली आहे. टीझर पेजनुसार, कंपनी हा स्मार्टफोन 23 जानेवारीला लॉन्च करेल. फ्लिपकार्टवरच्या साइटवर नोटिफाय मी चा पर्याय ही उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 40 हजार रूपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन प्रीज्म व्हाइट, प्रीज्म ब्लॅक आणि प्रीज्म ब्लू कलरमध्ये लॉन्च होईल. लक्षात असू द्या की, कंपनी 11 फेब्रुवारीला आपला गॅलेक्सी एस20 सीरिज सुद्धा घेऊन येत आहे. 

Samsung Galaxy S10 Lite specifications

स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झाल्यास, सॅमसंग गॅलेक्सी S10 लाइट स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 10 वर काम करेल. स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस इनफिनिटी ओ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. हा डिव्हाइस क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसरसोबत येईल. कंपनी हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमच्या पर्यायात उपलब्ध असेल. यासोबतच फोन 128 जीबीपर्यंत स्टोरेजसोबत येईल. 

फोनच स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवलं जाऊ शकतं. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. ज्यात मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल कॅमेरा आणि एक 5 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये कंपनीनं 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असणार आहे. डिवाइसला पावर देण्यासाठी 4500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येईल. यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी