Vivo V17 Launch: 9 डिसेंबरला वीवोचा हा नवीन स्मार्टफोन होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर

Vivo V17 Launch In India: वीवोनं आपल्या नव्या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचं निमंत्रण पाठवलं आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये पंच होल डिस्प्ले आणि क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

Vivo V17 Launch
9 डिसेंबरला वीवोचा हा नवीन स्मार्टफोन होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर  |  फोटो सौजन्य: Representative Image

मुंबईः  वीवोनं काही दिवसांपूर्वीच आपला V17 स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला. आता समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी हा स्मार्टफोन आता भारतीय बाजारात लॉन्च करत आहे. कंपनीनं 9 डिसेंबरला होणाऱ्या लॉन्चिंग सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. ज्यात वीवो V17 च्या लॉन्चिंग होऊ शकते. वीवोद्वारे पाठवण्यात आलेल्या निमंत्रणावर एक पंच होल सेल्फी कॅमेरा टीझ करत आहे. इतकंच काय तर निमंत्रण पत्रिकेवर केवळ वी सीरिजबद्दल सांगितलं आहे. 

Vivo V17 features

रिपोर्ट्सनुसार, वीवो V17 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप बघायला मिळेल. हा स्मार्टफोन फनटच ओएस 9.2 वर काम करेल. जो अॅन्ड्रॉईड 9 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.38 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड फुल व्यू डिस्प्ले मिळेल. स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरसोबत येईल. ज्यात 8 जीबीपर्यंत रॅमचा पर्याय आहे. 

फोनमध्ये 128 जीबीपर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. ज्यात 256 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं स्टोरेज वाढवू शकतो. वीवो V17 स्मार्टफोनध्ये डायमंड शेअर असलेला क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो, ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर मिळू शकतो. फोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासोबत येतो. स्मार्टफोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. 

रिपोर्ट्सनुसार, वीवो V17 स्मार्टफोन 9 डिसेंबरला भारतात लॉन्च होईल. पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर पंच होल डिस्प्लेवर फोकस केला आहे. दरम्यान रशियात लॉन्च झालेल्या V17 स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉचचा डिस्प्ले दिला आहे. वीवो वी17 प्रो स्मार्टफोन काही महिन्यांपूर्वीच भारतात लॉन्च झाला आहे. हा व्हेरिएंट पॉप अप सेल्फी कॅमेरा आणि क्वॉड रिअर कॅमेरा सपोर्ट करतो. या फोनची किंमत 29,990 रूपये आहे. 

कमी किंमतीत लॉन्च झाला वीवो यू20 स्मार्टफोन

 वीवोनं आपला नवीन स्मार्टफोन वीवो यू20 भारतात लॉन्च केलेला आहे. कंपनीनं या स्मार्टफोनला वीवो यू10च्या यशानंतर बाजारात आणलेलं आहे. वीवोनं या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिलेला आहे, ज्यातील प्रमुख कॅमेरा हा 16 मेगापिक्सेलचा आहे. वीवोनं या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा सुद्धा 16 मेगापिक्सेलचा दिला आहे. त्यामुळे याची फोटो क्वालिटी ग्राहकांना चांगली मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी