VLC Media Player वर बंदी, वेबसाईट आणि डाऊनलोड लिंक केली ब्लॉक

VLC Media Player banned: लोकप्रिय असा मीडिया प्लेअर असलेल्या VLC वर आता बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता व्हीएलसी प्लेअर भारतात कोणीही वापरु शकणार नाहीये. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • VLC मीडिया प्लेअरवर बंदी 
  • बंदीच्या संदर्भात भारत सरकारकडून काहीही सांगण्यात आलेले नाहीये

VLC media player: लोकप्रिय आणि प्रसिद्ध अशा व्हीएलसी मीडिया प्लेअर सॉफ्टवेअर आणि स्ट्रिमिंग मीडिया सर्वर VLC मीडिया प्लेअरवर भारतात बंदी (VLC Media Player banned) घालण्यात आली आहे. हा मीडिया प्लेअर VideoLAN प्रोजेक्टने डेव्हलप केला होता. MediaNama च्या रिपोर्टनुसार VLC मीडिया प्लेअरला भारतात बॅन करण्यात आलं आहे. तर ही बंदी करुन दोन महिने झाले आहेत. पण हा सॉफ्टवेअर तुमच्या डिव्हाइसमध्ये असेल तर ते सुरू राहणार आहे. मात्र, या बंदीच्या संदर्भात भारत सरकार किंवा व्हीएलसी मीडिया प्लेअर निर्माता कंपनीकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, VLC मीडिया प्लेअरवर भारतात बंदी घालण्यात आली होती कारण प्लॅटफॉर्मचा वापर चीन समर्थित हॅकिंग ग्रुप Cicada द्वारा सायबर हल्ल्यांसाठी करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी, सुरक्षा तज्ज्ञांना आढळले की, Cicada धोकादायक मालवेअर लोडर डिप्लॉय करण्यासाठी VLC मीडिया प्लेअरचा वापर करत होते. हा त्यांच्या सायबर हल्ल्याच्या मोहिमेचा एक भाग आहे.

अधिक वाचा : मोटोचा जबरदस्त फिचर्स असलेला 5G मोबाइल , किंमत फक्त...

VLC Media Player वर असलेली ही बंदी सॉफ्ट बंदी होती आणि त्यामुळे कंपनीकडून किंवा भारत सरकारने या मीडिया प्लॅटफॉर्मवर घालण्यात आलेल्या बंदीच्या संदर्भात कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र, ट्विटरवर काही लोकांनी या बंदीच्या संदर्भात ट्विट केलं आहे. एका ट्विटर युजरने VLC Media Player चा स्क्रिनशॉट ट्विट केला. या स्क्रिनशॉटमध्ये असे म्हटेल की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मंत्रालयाच्या आदेशानुसार वेबसाईटवरही बंदी घालण्यात आली आहे.

सध्या व्हीएलसी मीडिया प्लेअर हे वेबसाईट किंवा डाऊनलोडवर लिंक्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे भारतात या प्लॅटफॉर्मचा वापर कोणत्याही कामासाठी करू शकत नाही. ज्यांच्या डिव्हाईसमध्ये हे सॉफ्टवेअर आधीपासून आहे तेच लोक याचा वापर करु शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, ACTFibernet, Jio, Vodafone-idea यासारख्या सर्व प्रमुख कंपन्यांमध्ये VLC मीडिया प्लेअरवर बंदी घालण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी