VI ने लाँच केला नवा 'वर्क फ्रॉम होम' प्लॅन, पाहा काय आहे किंमत 

Work from Home plan: व्होडाफोन-आयडियाने एक नवीन 'वर्क फ्रॉम होम' प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ही रिचार्ज प्लॅन एक प्रकारचा अ‍ॅड-ऑन बूस्टर आहे.

Vodafone-Idea
VI ने लाँच केला नवा 'वर्क फ्रॉम होम' प्लॅन, पाहा काय आहे किंमत   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • व्होडाफोन-आयडियाने सुरु केला नवा प्लॅन
  • हा रिचार्ज प्लॅन प्रत्यक्षात यूजर्ससाठी अ‍ॅड-ऑन बूस्टर आहे
  • VI ने लाँच केला नवा वर्क फ्रॉम होम प्लॅन 

मुंबई: कोरोना महामारीच्या या काळात बहुतेक कर्मचारी आता 'वर्क फ्रॉम होम'च (Work from Home) करत आहेत, यामुळे डेटाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे लक्षात घेऊन अनेक दूरसंचार कंपन्या वेगवेगळे प्लॅन देत आहेत. आता व्होडाफोन-आयडियाने (Vodafone-Idea) एक नवीन 'वर्क फ्रॉम होम' प्रीपेड प्लॅन (Prepaid Plan) सुरू केला आहे. ज्याची किंमत ३५१ रुपये आहे. हा व्होडाफोन-आयडियाने आणलेला दुसरा डब्ल्यूएफएच प्लॅन आहे. जो या वर्षाच्या सुरूवातीस लाँच करण्यात आलेला होता. 

नव्या वर्क फ्रॉम होम प्रीपेड प्लॅनची किंमत ३५१ रुपये आहे. ज्याची वैधता ५६ दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये (VI) यूजर्संना 100GB 4G डेटा मिळेल. हा रिचार्ज प्लॅन प्रत्यक्षात त्या यूजर्ससाठी आहे ज्यांना अतिरिक्त डेटाची आवश्यकता असते. हा एक प्रकारचा बूस्टर आहे. ही नवीन व्हीआयच्या वेबसाइटवरील हा नवा प्लॅन आपल्याला अॅड ऑन सेक्शनमध्ये मिळू शकतो.

याशिवाय, VI ने आणखी एक वर्क फ्रॉम होम प्लॅन ऑफर केला आहे. ज्याची किंमत २५१ रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सला ५० जीबी डेटा मिळेल आणि त्याची वैधता २८ दिवसांसाठी आहे. या सेक्शनमध्ये VI यूजर्स अतिरिक्त डेटासाठी पर्याय म्हणून इतर प्लॅन्स देखील निवडू शकतात. ज्यामध्ये एकाची किंमत ९८ रुपये आहे. यामध्ये २८ दिवसांच्या वैधतेसह यूजर्संना १२ जीबी डेटा मिळेल. तर एक जीबी डेटा आणि २४ तासांच्या वैधतेसाठी १६ रुपयांच्या  किंमतीची प्लॅन देखील निवडू शकतो. दुसर्‍या प्लॅनची किंमत ४८ रुपये असून यात ३ जीबी डेटा मिळेल आणि त्याची वैधता २८ दिवसांची आहे.

व्होडाफोन-आयडिया ही कंपनी आत  viम्हणून ओळखली जाते. ३१ ऑगस्ट २०१८ रोजी व्होडाफोन इंडिया आयडिया सेल्युलरमध्ये विलीन झाली आणि विलीन झालेल्या कंपनीचे नाव बदलून वोडाफोन-आयडिया लिमिटेड करण्यात आले.

व्होडाफोनचा १०९ रुपये किंमतीचा प्लॅन 

सध्या मोबाइल स्वस्त प्लॅनविषयी बाजारात प्रचंड स्पर्धा आहे. अशावेळी व्होडाफोनच्या १०९ रुपयांच्या प्लॅन यूजर्ससाठी सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा आहे. यासह या प्लॅनमध्ये यूजर्संना १ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस देखील मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता २० दिवस अधिक आहे. काही सर्कल्समध्ये मिळणाऱ्या ९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अपग्रेड आहे. ज्यामध्ये यूजर्संना दोन दिवसांची अधिक वैधता मिळणार आहे. तथापि, ९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता १८ दिवसांची होती. त्याच वेळी, १०९ रुपयांच्या प्लॅन यूजर्संना व्होडाफोन प्ले आणि झी 5 अ‍ॅप्सच्या विनामूल्य सबस्क्रिप्शन मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी