सावधान ! तुमचं WhatsApp हॅक? 150 कोटी युजर्सला कंपनीने दिला 'हा' सल्ला

गॅजेट फिव्हर
Updated May 14, 2019 | 15:09 IST | टाइम्स नाऊ हिंदी

WhatsApp: व्हॉट्सअॅपने आपल्या 150 कोटी युजर्सला अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये एक बग आला असुन त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

WhatsApp spyware
तुमचं WhatsApp हॅक?   |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई: जर तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करता तर सावधान व्हा... कारण, व्हॉट्सअॅपमध्ये असा एक बग आला आहे ज्यामुळे तुमची माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. यामुळे व्हॉट्सअॅपने आपल्या तब्बल 150 ग्राहकांना अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये बग आल्याचं कंपनीच्या लक्षात आलं. याला स्पायवेअर म्हणतात. हा स्पायवेअर कॉलिंग फंक्शनद्वारे तुमच्या फोनमध्ये येण्याची शक्यता आहे.

फायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्पायवेअर इस्त्राईलमधील कंपनी एनएसओ ग्रुपने बनवला आहे. यामध्ये व्हॉट्सअॅफ ऑडिओ कॉलच्या माध्यमातून बग तुमच्या फोनमध्ये येऊ शकतो. तसेच हा बग तुमच्या फोनमध्ये स्पायवेअर आपोआप इंस्टॉल करतो.

WhatsApp चा युजर्सला सल्ला 

व्हॉट्सअॅपने सांगितले आहे की, त्यांना या बग संदर्भातील माहिती गेल्या महिन्यात समजली होती. आता हा इरर फिक्स करण्यात आला आहे. मात्र, युजर्सने आपलं अॅप लेटेस्ट व्हर्जनने अपडेट करणं आवश्यक आहे. इतकचं नाही तर युजर्सने आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा लेटेस्ट व्हर्जनने अपडेट करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.

असं करा WhatsApp अपडेट

जर तुमच्याकडे अँड्ऱॉईड फोन आहे तर गुगल प्ले स्टोअर मध्ये जा आणि WhatsApp टाइप करा. यानंतर व्हॉट्सअॅपवर जावून आपल्या फोनमध्ये आधीपासूनच इंस्टॉल केलेलं व्हॉट्सअॅप अपडेट करा. तर, अॅपल युजर्स आपल्या आयओएस स्टोरमधून अॅप अपडेट करु शकतात. 

आरोप फेटाळले

इस्त्राइलमधील एनएओ ग्रुप सरकारसाठी काम करतं. व्हॉट्सअॅपने सांगितले की, ही एक प्रायव्हेट कंपनी आहे जी सरकारसोबत मिळून काम करते. दुसरीकडे एनएसओने हे आरोप फेटाळले आहेत. व्हॉट्सअॅपच्या मते, या बग मुळे खूपच कमी युजर्सला फटका बसला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी