WhatsApp, टेलिग्राम वापरताय? मग ही बातमी वाचाच

गॅजेट फिव्हर
Updated Jul 22, 2019 | 10:30 IST | टाइम्स नाऊ हिंदी

WhatsApp Security: व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या दोन प्रसिद्ध मेसेजिंग अॅप संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, युजर्सचे प्रायव्हेट फोटोज आणि व्हिडिओसोबत हॅकर्स छेडछाड करु शकतात.

WhatsApp security
WhatsApp, टेलिग्रामचा वापर असुरक्षित?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दोन्ही अॅप्समध्ये अॅन्ड टू अॅन्ड एन्क्रिप्शन फिचर
  • व्हॉट्सअॅप, टेलिग्राम युजर्सचा खासगी माहिती हॅकर्स चोरी करु शकतात
  • या दोन्ही अॅपच्या युजर्सचे फोटो, व्हिडिओसोबत छेडछाड होऊ शकते

नवी दिल्ली: इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामचा वापर जर तुम्ही करता तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम युजर्सचे प्रायव्हेट फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती हॅकर्स चोरी करु शकतात. इतकचं नाही तर तुमच्या फोटो, व्हिडिओसोबत हॅकर्स छेडछाडही करु शकतात. या समस्येची माहिती सायबर सिक्युरिटी फर्म सिमेंटेकने दिली आहे. सिमेंटेक रिसर्चरने मीडिया फाइल जॅकिंगमध्ये दावा केला आहे की, या अॅप्सच्या सुरक्षेत अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

जर असं खरोखर झालं तर हॅकर्स व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम युजर्सची माहिती म्हणजेच फोटो, व्हिडिओचा गैरवापर करु शकतात. व्हॉट्सॅप, टेलिग्राम वरुन माहिती चोरून हॅकर्स त्याचा वापर आपल्या वैयक्तिक लाभासाठी किंवा चुकीच्या कामांसाठी करण्याची शक्यता आहे. दोन्ही मेसेजिंग अॅप्स हे अॅन्ड टू अॅन्ड एन्क्रिप्शन सिक्युरिटी देतात. जे सेंडरची ओळख लपवणं आणि हॅकर्सच्या नजरेतून युजर्सच्या मेसेजची सुरक्षा करण्याचं काम करण्याच्या उद्देशाने डिझाइन केलेलं आहे. मात्र, तज्ञांच्या मते, या अॅपच्या माध्यमातून हॅकर्स व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामवरील माहिती चोरू शकतात.

संशोधकांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सामान्यपणे असं मानलं जातं की नव्या पीढीच्या इंस्टंट मेसेजिंग अॅपमधील कंटेंटसोबत छेडछाड आणि प्रायव्हसीची सुरक्षा केली जाते. अॅन्ड टू अॅन्ड एन्क्रिप्शनमुळे दोन व्यक्तींमधील संवाद तिसरा व्यक्ती ऐकू शकत नाही. मात्र, हे पुरेसे नाहीये, जर हॅकर्सने आधीपासून कोडमध्ये प्रवेश केला असेल तर ही सुरक्षा काहीही कामाची नाहीये.

ज्याच्या माध्यमातून हॅकर्स व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या मीडिया फाईल्सचा अॅक्सेस मिळवू शकतात. तसेच व्हॉट्सअॅप, टेलिग्राममधील डेटापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हॅकर्स मिळवू शकतात ती समस्या संशोधकांनी शोधली आहे. जर हॅकर्सने याचा वापर केला तर एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच एखाद्या राजकीय व्यक्ती किंवा एखाद्या मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्याचा फोटो, व्हिडिओ यांच्यासोबत छेडछाड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप अँड्रॉईडमध्ये हे फिचर डिफॉल्ट रूपात अॅक्टिव्ह आहे.तर टेलिग्राममध्ये हे फिचर अॅक्टिव्ह नाहीये. जेव्हा तुम्ही सेव्ह टू गॅलरी फिचर एनेबल करता तेव्हा हे फिचर टेलिग्राममध्ये अॅक्टिव्ह होतं. सिमेंटेकच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अॅपमध्ये युजर्सच्या मीडिया फाईल्सची सुरक्षा करण्यासाठी खास सुविधा उपलब्ध नाहीये. गुगलच्या पुढील अँड्रॉईड व्हेरिएंट म्हणजेच अँड्रॉईड क्यू मध्ये अशा प्रकारची सुरक्षा समस्या रोखण्यासाठी काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. ज्याच्या माध्यमातून युजर्सचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होईल.

त्यामुळे तुम्ही जर व्हॉट्सअॅप, टेलिग्राम वापरता तर काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचं थर्ड पार्टी अॅप फोनमध्ये इंस्टॉल करु नका. अन्यथा तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी होऊ शकते. युजर्सने आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या नकळत हॅकर्स तुमचा डेटा चोरी करु शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
WhatsApp, टेलिग्राम वापरताय? मग ही बातमी वाचाच Description: WhatsApp Security: व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम या दोन प्रसिद्ध मेसेजिंग अॅप संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, युजर्सचे प्रायव्हेट फोटोज आणि व्हिडिओसोबत हॅकर्स छेडछाड करु शकतात.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...