WhatsApp वर तुम्हाला कुणी ब्लॉक केलंय कसं कळेल? 'या' ५ स्टेप्सने मिळवा माहिती 

WhatsApp updates: व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जवळपास सर्वच स्मार्टफोन युजर्स करत असतात. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या आयओएस आणि अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर युजर्सला एक ब्लॉक करण्याचा पर्याय देतात. जेणेकरून विनाकारण तुम्हाला कुणीही मेसेज करणार नाही. 

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्याला कुणी ब्लॉक केलंय कसं ओळखावं? 
  • सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर या संदर्भात कुठलंही फिचर नाहीये 
  • मात्र, काही टिप्सच्या माध्यमातून तुम्ही हे ओळखू शकतात

मुंबई : WhatsApp आपल्या आयओएस आणि अँड्रॉईड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर एक सुविधा देतं ज्यानुसार तुम्ही अनावश्यक मेसेंजर्सला ब्लॉक करू शकतात. अशा परिस्थितीत तुम्हालाही कुणी जर व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलं असेल तर ते कसं ओळखाल? सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर हे ओळखण्याचं कुठलंही फिचर नाहीये मात्र, काही टिप्सच्या माध्यमातून तुम्ही हे ओळखू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच संदर्भात काही माहिती देणार आहोत. जाणून घ्या काय आहेत या पाच टिप्स.

लास्ट सीन / अनलॉक स्टेट्स चेक करा

जर तुम्हाला कुणाचं ऑनलाईन स्टेटस किंवा लास्ट सीन दिसत नाहीये तर शक्यता आहे की, त्या व्यक्तीने तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलं आहे.

प्रोफाईल फोटो 

जर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील एखाद्या युजरचा प्रोफाईल फोटो अचानक दिसणं बंद झाला तर दाट शक्यता आहे की त्या व्यक्तीने तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलं असावं. मात्र, यात अशीही शक्यता असते की, तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील त्या व्यक्तीने आपला प्रोफाईल पीक हटवला असू शकतो.

हे पण वाचा : Instagram Down : इन्स्टाग्राम झाले डाऊन, ट्विटरवर पडला तक्रारींचा पाऊस, #InstagramDown ट्रेडिंगमध्ये

मेसेज डिलिव्हरी स्टेटस तपासा

जर तुम्हाला संशय आहे की, तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर कुणी ब्लॉक केलं आहे तर त्या व्यक्तीला एखादा मेसेज पाठवून पाहा. जर तुमचा मेसेज डिलिव्हर झाला नाही तर दोन शक्यता आहेत. एक म्हणजे समोरील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असेल किंवा दुसरी शक्यता म्हणजे त्या व्यक्तीचं इंटरनेट कनेक्शन बंद आहे. जर एक-दोन दिवसात सुद्धा तुमचा मेसेज डिलिव्हर झाला नसेल तर दाट शक्यता आहे की, तुम्हाला त्या व्यक्तीने ब्लॉक केलं आहे.

कॉन्टॅक्टवर कॉल करा 

जर तुम्हाला संशय आहे की, समोरील व्यक्तीने तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलं आहे तर त्या व्यक्तीला कॉल करण्याचा प्रयत्न करा. जर समोरील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर तुमचा कॉल त्याच्यापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणजेच तुम्हाला रिंगिंग स्टेटस दिसणार नाही.

एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप क्रिएट करा

जर तुम्हाला वाटेल की, तुम्हाला एखाद्याने ब्लॉक केलं तर व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप बनवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मेसेज आला की, या व्यक्तीला अॅड करण्यासाठी तुम्ही ऑथोराइज्ड नाहीयेत तर शक्यता आहे की, समोरील व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी