Xiamoi Black Friday sale: शाओमीचा सेल, 'या' स्मार्टफोनवर मिळणार डिस्काऊंट

Xiamoi Black Friday sale: शाओमीचा ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये विविध रेडमी आणि मी स्मार्टफोन आणि अन्य प्रोडक्ट्सवर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे. जाणून घ्या शाओमी कोणत्या प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट देत आहे.

Xiaomi Black Friday Sale
Xiamoi Black Friday sale: शाओमीचा सेल, 'या' स्मार्टफोनवर मिळणार डिस्काऊंट 

थोडं पण कामाचं

  • शाओमीनं ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे.
  • या सेलमध्ये मी A3, रेडमी K30, रेडमी K20pro, पोको F1 आणि रेडमी नोट 7S वर डिस्काऊंट मिळणार आहे.
  • भारतात शाओमीचा ब्लॅक फ्रायडे सेल 29 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून सुरू झाला आहे.

मुंबईः शाओमीनं ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये मी A3, रेडमी K30, रेडमी K20pro, पोको F1 आणि रेडमी नोट 7S वर डिस्काऊंट मिळणार आहे. भारतात शाओमीचा ब्लॅक फ्रायडे सेल 29 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून सुरू झाला आहे. हा सेल 2 डिसेंबरपर्यंत असणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये मी हेडफोन कम्फर्ट, मी ब्लूटूथ स्पीकर 2, मी एलईडी स्मार्ट बल्ब, मी फोकस केबल आणि मी सेल्फी स्टिकवर सुद्धा ऑफर मिळत आहेत. 

ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये शाओमी एक्सजेंच ऑफर आणि इंस्टंट डिस्काऊंटसारखे फिचर सुद्धा देत आहेत. कंपनी एचडीएफसी बँकेच्या कार्डवर ईएमआय आणि इंस्टंट डिस्काऊंटची ऑफर देत आहे. शाओमीच्या सेलमध्ये फिल्मकार्ट, अॅमेझॉन, मी डॉट कॉम, मी होम स्टोर आणि विविध आऊटलेट पार्टनरमधून या सेलचा भाग होऊ शकता. 

Black Friday Sale offers on Xiaomi phones

शाओमी बऱ्याच स्मार्टफोनवर या सेलमध्ये डिस्काऊंट देत आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये शाओमी मी A3 स्मार्टफोनवर डिस्काऊंट देत आहेत. हा स्मार्टफोन 12,499 रूपयांच्या किंमतीत उपलब्ध होईल. रेडमी के20 स्मार्टफोन 19,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीला मिळत आहे. रेडमी के20 प्रो स्मार्टफोन 25,999 रूपये किंमतीवर उपलब्ध आहे. रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो दोन्हीही स्मार्टफोन 21,999 रूपये आणि 27,999 रूपयांच्या किंमतीला क्रमशः लॉन्च झाले होते. 

अशा प्रकारे पोको एफ1 स्मार्टफोन या सेलमध्ये 3000 रूपयांच्या डिस्काऊंटवर उपलब्ध होईल. तर रेडमी नोट 7S स्मार्टफोन 8,999 रूपयांच्या सुरूवातीच्या किंमतीला तुम्ही खरेदी करू शकणार आहेत. जो 9,999 रूपयांना आतापर्यंत मिळत आहे. ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये रेडमी वाय 3 वर सुद्धा 2000 रूपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. रेडमी 7A स्मार्टफोनवर 700 रूपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. 

शाओमी या सेलमध्ये एचडीएफसी बँकेचं डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काऊंट देत आहे. ही ऑफर अॅमेझॉन, फिल्मकार्ट आणि मी डॉट कॉम तिन्हीवर उपलब्ध आहे. यासोबतच ग्राहकांना ऑफ लाइन पार्टनर्सच्या माध्यमातून खरेदी केल्यावर 1500 रूपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी