शाओमी MI A3 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर 

शाओमीनं आपला नवीन स्मार्टफोन मी A3 भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 48 मेगापिक्सल लेंससोबत ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. 

xiaomi mi
शाओमी MI A3 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फिचर  

शाओमीनं भारतात आपला नवीन मी स्मार्टफोन A3 लॉन्च केला आहे. हा फोन अॅन्ड्रॉईड वन प्रोग्रामचा एक भाग आहे. मी A3 स्मार्टफोन ग्रेडिएंट बॅक, वॉटर ड्रॉप नॉच, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसोबत मिळेल. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 48 मेगापिक्सलचा रिअर लेंसचा देण्यात आली आहे. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरवर काम करतं. यात डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिलं आहे. हा फोन स्टॉक अॅन्ड्रॉईडसोबत येतो. जी या स्मार्टफोनची खासियत आहे.  हा फोन अमेझॉन इंडिया आणि मी डॉट कॉम दोन्हीकडे उपलब्ध आहे. 

शाओमी मी A3 ची भारतात उपलब्धता आणि किंमत 

शाओमी मी A3 स्मार्टफोन 12,999 रूपयांच्या किंमतीत लॉन्च झाला आहे. या किंमतीत स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटचा मिळेल आणि फोनचा 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रूपयांना येईल. या फोनमध्ये नॉट जस्ट ब्लू, मोर दैन व्हाइट आणि काइंड ऑफ ग्रे कलरच्या पर्यायात उपलब्ध होईल. हा फोन तुम्ही अॅमेझॉन इंडिया, मी डॉट कॉम आणि मी होम स्टोरवरून खरेदी करू शकता. फोन २३ ऑगस्टपासून उपलब्ध होईल. लवकरच ऑफलाईन बाजारातही देखील फोन उपलब्ध होईल. 

मी A3 चे फिचर 

मी A3 स्मार्टफोनमध्ये 6.08 इंचाचा एचडीप प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत मिळेल. हा फोन अॅन्ड्रॉईड 9वर काम करतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर दिलं आहे. जे 4 जीबी आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेजच्या पर्यायासोबत मिळेल. फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डचा पर्याय देण्यात आला आहे. ज्याच्या मदतीनं 256 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवू शकतो. 

फोटोसाठी मी A3 स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. ज्यात एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी लेंस दिलं आहे. यात 118 डिग्री वाइड एंगल लेंससोबत 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्श सेंसर देण्यात आलं आहे. फ्रंटमध्ये कंपनीनं 32 मेगापिक्सल लेंस दिलं आहे. 

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G वोएलटीई, वायफाय, ब्लूटूथ वी5.0, जीपीएस, युएसबी टाइप सी आणि 3.5 एमएमचा हेडफोन जॅक दिलं आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सुद्धा आहे. फोनमध्ये 4,030 एमएएचची बॅटरी दिली आहे. जी 18 वॉटच्या फास्ट चार्जिंग फिचरसोबत येतं. शाओमीनं हा फोन याआधी चीनमध्ये लॉन्च केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...