Redmi K20: रेडमी के20 चे किंमत आणि फिचर लीक 

गॅजेट फिव्हर
Updated May 25, 2019 | 16:07 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

Redmi K20: रेडमी के20  स्मार्टफोन २८ मे रोजी लॉन्च होत आहे. या स्मार्टफोनची थेट स्पर्धा वनप्लस 7 प्रो सोबत होणार आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स. 

Redmi K20
Redmi K20: रेडमी के20 चे किंमत आणि फिचर लीक  

Redmi K20 features and price:  शाओमी आपल्या नवीन स्मार्टफोनमुळे सतत चर्चेत आहे. कंपनीनं या स्मार्टफोनला फ्लॅगशिप किलरच्या रूपात पुरस्कृत केलं आहे. २८ मे रोजी लॉन्च होणारा शाओमीच्या रेडमी के20 स्मार्टफोनची स्पर्धा वनप्लस 7 प्रो सोबत होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असेल असं म्हटलं जातं आहे. तर शाओमी इंडियाचे प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विट केल्यानंतर हा फोन खूपच चर्चेत आहे. 

रेडमी चीनमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करत आहे. त्यासाठी कंपनी सतत आपल्या वीबो पेजवर रेडमी के20 या स्मार्टफोन संदर्भात टीज करत आहे. दरम्यान या स्मार्टफोनचे नवीननवीन फिचर सुद्धा समोर आले आहे. कंपनीनं आपल्या टीझरमध्ये माहिती दिली की, या स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा लिनियर स्पीकर असेल. शाओमीचे जनरल मॅनेजर लू विबिंग यांनी यासंदर्भात स्पष्टिकरण दिलं की, के20 या स्मार्टफोनमध्ये खूप फास्ट म्युझिक चालेल. तसंच तुमचं गेमिंग एक्सपीरियंस खूप चांगलं बनवेल. 

तर अन्य काही टीझरमध्ये दाखवण्यात आलं की, रेडमी के20 मध्ये गेम टर्बो 2.0 फिचर असेल. जे कंपनीनं हल्लीच पोको एफ1 स्मार्टफोनमध्ये दिलं आहे. हे फिचर गेमिंग एक्सपीरियंस चांगलं देत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. त्यासोबत विबिंग यांनी स्पष्टिकरण दिलं की, के20 स्मार्टफोनमध्ये डीसी डिमिंग फिचर असेल. याव्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये 3.5 एमएम हेडफोन जॅक देखील मिळणार आहे. 

चीनमध्ये रेडमीनं या फोनची प्रीबुकिंग सुरू केली आहे. २४ मे पासून हा स्मार्टफोन १०० युआन (जवळपास १०० रूपये) च्या किंमतीत प्रीबुक केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या किंमतीवर एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात फोनमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएंटची किंमतीबाबत दावा करण्यात आला आहे. रेडमी के20 स्मार्टफोनची किंमत 2,599 युआन (जवळपास २६,१०० रूपये) असेल. ही किंमत ६ जीबी रॅम, ६४ जीबी रॅम व्हेरिएंटची असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

तर या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम 128 जीबी व्हेरिएंटची किंमत 2,799 युआन (जवळपास 28,100 रूपये) आणि 8 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,999 युआन ( जवळपास 30,200 रूपये) असेल. या स्मार्टफोनमध्ये 4000 एमएएचची बॅटरी, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर मिळेल. तर काही रिपोर्ट्स सांगण्यात आलं की, हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट रेडमी के20 आणि रेडमी के20 प्रोमध्ये लॉन्च होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Redmi K20: रेडमी के20 चे किंमत आणि फिचर लीक  Description: Redmi K20: रेडमी के20  स्मार्टफोन २८ मे रोजी लॉन्च होत आहे. या स्मार्टफोनची थेट स्पर्धा वनप्लस 7 प्रो सोबत होणार आहे. जाणून घ्या या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola