श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रोने अंतराळ क्षेत्रात आपलं आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन या स्पेस सेंटरवरुन (Satish Dhawan Space Centre) इस्रोने पीएसएलव्ही सी 51 (PSLV-C51)च्या माध्यमातून ब्राझीलच्या अॅमेझॉनिया 1 (Amazonia 1) उपग्रहासह एकूण 19 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.
ब्राझिलच्या अॅमेझॉनिया 1 या उपग्रहासह इतरही 18 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. या 18 उपग्रहांमध्ये इस्रोचे चार उपग्रह असून तीन उपग्रह हे शैक्षणिक संस्थांशी संबंधित तर एक रेडीएशनचा अभ्यास करणार आहेत. यापैकी एका नॅनो उपग्रहावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि नावही आहे.
पीएसएलव्ही-सी51 ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आले आहे. ब्राझीलच्या स्पेस रिसर्च सेंटरने तयार केलेला अॅमेझॉनिया 1 या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. अॅमेझॉनिया 1 हा ब्राझिलचा पहिला ऑप्टिकल अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. याच्या माध्यमातून ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलात झाडे आणि इतर बदलांवर नजर ठेवण्याचं काम होणार आहे.