१ मिनिटांत तब्बल १ लाख फोनची विक्री, पाहा कोणता आहे हा फोन

फोना-फोनी
Updated Apr 30, 2021 | 13:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Redmi K40 Gaming Edition हा फोन चीनमद्ये २७ एप्रिलला लाँच करण्यात आला होता. यात गेमिंग फीचर्स आहेत. कंपनीने या फोनमध्ये आकर्षक शोल्डर बटन, तीन माईक्स, डॉल्बी एटमॉस सपोर्ट आणि जेबीएलचा ऑडिओ ट्यून असे फीचर्स दिले

redmi40k
१ मिनिटांत तब्बल १ लाख फोनची विक्री, पाहा कोणता आहे हा फोन 

थोडं पण कामाचं

 • Redmi K40 Gaming Edition ची पहिली सेल ३० एप्रिलला सुरू झाली होती. 
 • Redmi K40 Gaming Editionमध्ये तीन कॅमेरा आहेत
 • Redmi K40 Gaming Editionचा पहिला सेल ३० एप्रिलला आयोजित करण्यात आला होता

मुंबई: Redmi K40 Gaming Edition या स्मार्टफोनचा पहिला सेल ३० एप्रिलला चीनमध्ये सुरू करण्यात आला होता जो तेथील स्थानिक वेळेनुसार १० वाजता सुरू झाला होता. दरम्यान सेल सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच कंपनीने आपल्या चीनी मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोच्या माध्यमातून माहिती दिली की सेल सुरू झाल्यानंतर अवघ्या १ मिनिटांत तब्बल १ लाख स्मार्टफोन विकले गेले. Redmi K40 Gaming Edition हा फोन चीनमध्ये २७ एप्रिलला लाँच करण्यात आला होता. हा गेमिंगचे फीचर्स असलेला फोन आहे. 

Redmi K40 Gaming Editionचा पहिला सेल ३० एप्रिलला आयोजित करण्यात आला होता. जो सुरू होताच तब्बल १ लाख स्मार्टफोनची विक्री लगेचच झाली. MyDrivers च्या एका अन्य रिपोर्टमध्ये माहिती दिली की यासेलमध्ये Bruce Lee एडिशनचाही समावेश होता. याची १२ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज कॉन्फिगरेशनची किंमत साधारण ३२ हजार ३०० रूपये आहे. हा फोन वेगळ्या पॅकेजिंगसह आला होता. 

Redmi K40 Gaming Editionच्या किंमतीत बाबत बोलायचे झाल्यास याची किंमत CNY 1,999 म्हणजेच साधारण 23000 रूपये. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेल मिळते. याशिवाय फोनमध्ये ८ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 2,199 म्हणजेच साधारण 25300 रूपये. तर ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत  CNY 2,399 म्हणजेच साधारण 27,600 रूपये आणि १२ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 2,399

Redmi K40 Gaming Editionचे फीचर्स

 1. डिस्प्ले - 6.67 इंच
 2. रॅम - 6 जीबी
 3. स्टोरेज - 128 जीबी
 4. ऑपरेटिंग सिस्टीम - अँड्रॉईड
 5. फ्रंट कॅमेरा - 16 मेगापिक्सल
 6. रेयर कॅमेरा - 64 मेगापिक्सेल, 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल
 7. बॅटरी क्षमता - 5,065mAh
 8. रेझोल्युशन - 1080

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी