5G in India: भारतातील या १३ शहरांमध्ये सुरू होणार 5G सेवा, जाणून घ्या तुमच्या शहरात 5G सुरू होणार की नाही?

भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. या 5G इंटरनेटमध्ये 4G पेक्षा १०पट जास्त इंटरनेटची स्पीड असणार आहे. 5G सेवेमुळे इंटरनेट वापरण्याची पद्धतच बदलणार आहे. ग्राहकांची बफरिंगपासून सुटका होणार आहे आणि स्ट्रीमिंग सेवा आणखी चांगली होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आधी १३ शहरांमध्ये ही 5G सेवा सुरू होणार आहे, त्यानंतर संपूर्ण देशात ही सेवा सुरू होणार आहे.

5G internet in india
५ जी इंटरनेट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे.
  • या 5G इंटरनेटमध्ये 4G पेक्षा १०पट जास्त इंटरनेटची स्पीड असणार आहे.
  • ऑक्टोबर महिन्यात आधी १३ शहरांमध्ये ही 5G सेवा सुरू होणार आहे.

5G in India: नवी दिल्ली : भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. या 5G इंटरनेटमध्ये 4G पेक्षा १०पट जास्त इंटरनेटची स्पीड असणार आहे. 5G सेवेमुळे इंटरनेट वापरण्याची पद्धतच बदलणार आहे. ग्राहकांची बफरिंगपासून सुटका होणार आहे आणि स्ट्रीमिंग सेवा आणखी चांगली होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आधी १३ शहरांमध्ये ही 5G सेवा सुरू होणार आहे, त्यानंतर संपूर्ण देशात ही सेवा सुरू होणार आहे.

5G Support : तुमच्या मोबाईलमध्ये 5G सपोर्ट आहे की नाही? असं करा चेक

भारत सरकारने टेलिकॉम कंपन्यांना भारतात 5G सेवा देण्यास परवानगी दिलेली आहे. तुम्हाला 5Gची सेवा हवी असेल तर तुमच्याकडे 5G मोबाईल असणे गरजेचे आहे. भारतात सर्वप्रथम जियो आणि एअरटेल 5Gची सेवा देणार आहेत.

एअरटेल आणि जियो कंपनीने २०२४ पर्यंत संपूर्ण देशात 5G सेवा देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यादरम्यान वोडाफोन आयडियाने दिल्लीत 5G सेवा सुरू करणार आहे. तसे मेसेजेस वोडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांना पाठवले आहेत.

5G service cost: 5G सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार? कसा असेल तुमचा आवडता पॅक? वाचा..

पंतप्रधान मोदींकडून घोषणा

भारतात लवकरच ऑप्टिकल फायबर सेव सुरू होईल अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिना निमित्त केली होती. त्यामुळे देशाच्या कानकोपर्‍यात इंटरनेट पोहोचेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान २९ सप्टेंबर २०२२ रोजी इंडिया मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी देशात 5G लॉन्च होईल असे सांगितले जात आहे.

5G Smartphone:  म्हणून 5G Smartphone  घेणे तुमच्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या 5G स्मार्टफोनचे फीचर्स

मुंबईसह या शहरांत सुरू होणार 5G

4G प्रमाणेच 5G सेवा सुद्धा देशात टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. देशातील १३ शहरांत ही सेवा सुरू होणार आहे त्यात राजधानी दिल्ली, गुरूग्राम, चंडीगढ, गांधीनगर, अहमदाबाद, लखनौ, बेंगळुरू, चेन्नई, जामनगर, कोलकाता, मुंबई आणि पुणे या शहरांचा समावेश आहे. 5G मुळे फक्त इंटरनेट सुविधाच नव्हे तर कॉलिंग सेवाही चांगली होणार आहे. 5G मुळे कॉल ड्रॉप होण्याचे प्रमाण कमी होईल असेही सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी