5G service and cost in India: आता भारतात लवकरच 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. जिओ आणि एअरटेल या दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्यां या महिन्याच्या अखेरीस 5G सेवा सुरू करू शकतात. त्याचप्रमाणे Vi लवकरच 5G नेटवर्क देखील लॉन्च करु शकते. आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार असल्याचं म्हटलं होते. या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की, 5G सेवा सुरू होईल मात्र, यासाठी सर्वसामान्यांना किती पैसे मोजावे लागतील? (5g service in india how much service cost you have to paid and what about pack read in marathi)
सध्या टेलिकॉम कंपन्यांनी 5G च्या किमती अजून निश्चित केलेल्या नाहीयेत. मात्र, एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल यांनी अलिकडेच इंडिया टुडेला सांगितले की, 5G ची किंमत 4G योजनांप्रमाणेच असेल. त्यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले की, जर तुम्ही अशा मार्केटमध्ये पाहिलं की जेथे यापूर्वीच 5G सेवा सुरू आहे. तर तेथे 4G सेवेपेक्षा जास्त शुल्क आकारतले जात नाहीत.
सध्या जिओ आणि Vi ने आपल्या प्लान्सच्या किमतीबद्दल काही सांगितले नाही. परंतु, अशी अपेक्षा आहे की जर एअरटेलने स्वस्त प्लान्स आणले तर जिओ आणि Vi सारख्या कंपन्या देखील त्यांच्या 5G सेवा तुलनेने आक्रमक किमतीत ऑफर करण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा : १.३५ कोटी महिलांना मिळणार मोफत स्मार्टफोन, सरकार खर्च करणार १२००० कोटी रुपये
जुन्या रिपोर्ट्सनुसार, 5G सेवेसाठी आकारले जाणारे शुल्क हे 4G च्या तुलनेत अधिक असतील. अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, 5G सेवेच्या सुरुवातीला स्वस्तात ही सेवा देण्यात येईल.
असं म्हटल जात आहे की, टेलिकॉम कंपन्यांकडून आधी स्वस्तात आणि नंतर 5G सेवेसाठी अधिक पैसे आकारले जावू शकतात. सध्या भारतात 5G सेवा सर्वप्रथम कोण सुरू करणार हे स्पष्ट नाहीये. मात्र, सध्या अशी अपेक्षा आहे की, रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडून ही सेवा सुरू केली जाईल.