5Gमुळे जाणून घ्या तुमचे जीवन कसे बदलेल आणि या शहरांत मिळणार पहिलांदा सेवा, पाहा संपूर्ण यादी 

5G Service In India: यशस्वी चाचणीनंतर, आता लवकरच भारतात 5G सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलाव तयार आहे. 2022 मध्ये देशात 5G सेवा सुरू करण्याची सरकारची योजना आहे.

5g service trail successful how life will change and when and where it will roll out first check the full list of city in india
या शहरांत मिळणार पहिलांदा 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • इंटरनेट नेटवर्कच्या पाचव्या जनरेशनला 5G म्हणतात, जी वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आहे.
  • 5G सेवा आल्यानंतर इंटरनेटचा वेग सुमारे 10 पटीने वाढेल.
  • पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे

5G Service In India:भारताने  5G च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. गुरुवारी (19 मे), आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी IIT मद्रास येथे 5G कॉल यशस्वीपणे केला. या यशस्वी चाचणीनंतर, आता लवकरच भारतात 5G सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलाव तयार आहे. 2022 मध्ये देशात 5G सेवा सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असे झाल्यास, 5G सेवा उपलब्ध असणार्‍या जगातील मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होईल. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की 5G देशाच्या अर्थव्यवस्थेत 450 अब्ज डॉलर योगदान देईल. खरं तर, 5G सेवा आल्यानंतर इंटरनेटचा वेग सुमारे 10-15 पट वाढेल. अशा परिस्थितीत, ग्राहकांना केवळ बफरिंगपासून स्वातंत्र्य मिळणार नाही. उलट त्याचा फायदा दैनंदिन गोष्टींपासून ते शिक्षण, आरोग्य सेवेपर्यंत दिसून येईल.

अधिक वाचा : राज्यात लवकरच मान्सूनची दमदार एन्ट्री

5G सेवा म्हणजे काय

इंटरनेट नेटवर्कच्या पाचव्या जनरेशनला 5G म्हणतात. ही एक वायरलेस ब्रॉडबँड इंटरनेट सेवा आहे जी लहरींद्वारे हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते 4G पेक्षा कमी क्षेत्र कव्हरेजमध्ये अधिकाधिक लोकांना हाय स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करते. क्वालकॉमच्या (Qualcom)एका अहवालानुसार, जास्तीत जास्त 20 गीगाबाइट्स प्रति सेकंदाचा वेग देऊ शकते. तर सरासरी 100 प्लस मेगा बाइट्सचा वेग उपलब्ध आहे. आणि 5G मध्ये 4G पेक्षा 100 पट जास्त ट्रॅफिक आणि नेटवर्क मॅनेज करण्याची क्षमता आहे.

अधिक वाचा : IPL 2022नंतर टीम इंडियासाठी खेळणार हे ३ घातक गोलंदाज

युजर्सला हे फायदे 

5G सेवा सुरू केल्यानंतर, युजर्सचा अनुभव खूप बदलणार आहे. जसे 4G ने युजर्सचे जग क्षणार्धात बदलून टाकले होते. त्याचप्रमाणे 5G आल्यानंतर बरेच काही बदलणार आहे. इंटरनेट स्पीड 10 पट वाढवण्याचा सर्वात मोठा फायदा होईल. याचा फायदा असा होईल की बफरिंगपासून सुटका होईल. याशिवाय व्हॉट्सअॅप कॉलमधील व्यत्ययही संपणार आहे. चित्रपट 10-15 सेकंदात डाउनलोड होईल. व्हर्च्युअल रियल्टी अनेक क्षेत्रांत आपला ठसा उमटवेल. गेमिंग जग बदलेल. तसेच दुर्गम भागात शैक्षणिक सेवा आणि आरोग्य सेवा पोहोचणे सोपे होणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रात ड्रोन आदींचा वापर करणे सोपे होणार आहे. त्याचप्रमाणे Metaverse सारख्या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्षात होईल.

अधिक वाचा : सोने नीचांकीवरून सावरले, भाव स्थिर... चांदीमध्ये किरकोळ घसरण

जूनमध्ये लिलाव होऊ शकतो

ट्रायच्या स्पेक्ट्रम लिलावाच्या शिफारशींनंतर आता सरकार जूनमध्ये स्पेक्ट्रम लिलाव करण्याची शक्यता आहे. आणि येत्या काही दिवसांत यासंदर्भातील मंजुरीही मंत्रिमंडळाकडून मिळू शकते. स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया जूनमध्ये होऊ शकते, असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एप्रिलमध्ये सांगितले होते. TRAI च्या शिफारशींवर आधारित, 5G स्पेक्ट्रमच्या लिलावातून सरकार 7.5 लाख कोटी रुपयांपर्यंत कमवू शकते. यासाठी TRAI ने 30 वर्षांपर्यंत परवाना कालावधीसाठी वेगवेगळ्या बँडमध्ये लिलाव करण्याची शिफारस केली होती. तथापि, उद्योग संघटना COAI ने स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या किंमतीबद्दल निराशा व्यक्त केली होती. भाव खूप जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.

या 13 शहरांमध्ये प्रथम 5G

5G सेवा सुरू करण्यासाठी, भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडियाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. दूरसंचार विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात दिल्ली, गुरुग्राम, लखनऊ, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंदीगड, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, पुणे, गांधी नगर येथे 5G सेवा सुरू करण्यात येणार आहेत. म्हणजेच सर्वात आधी या शहरांतील लोकांना 5G सुविधा मिळणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी