Smatphones: लॉकडाऊननंतर भारतात तब्बल 5 कोटी स्मार्टफोन्सची विक्री, चिनी कंपन्यांचा दबदबा

Smartphone Sale after lockdown: लॉकडाऊन नंतर भारतातील स्मार्टफोन बाजारात पुन्हा तेजी आली आणि सर्वाधिक चिनी स्मार्टफोन विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Smartphone
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली : लॉकडाऊन (Lockdonw) नंतर भारतातील स्मार्टफोन (Smartphone) बाजारात पुन्हा एकदा तेजी आली असून मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. 2020च्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) या कालावधीत स्मार्टफोनची विक्री ही उच्च स्तरावर पोहोचली. या काळात तब्बल पाच कोटी स्मार्टफोन्सची विक्री (5 Crore smatphones sold) झाली आहे. या काळात बाजारात विक्री झालेल्या स्मार्टफोन्समध्ये सर्वाधिक वाटा हा चिनी कंपन्यांचा आहे. कारण एकूण स्मार्टफोन्सच्या विक्रीपैकी 76 टक्के स्मार्टफोन्स हे चिनी कंपन्यांचे होते.

बाजारातील डेटा संकलन करणारी कंपनी कॅनालिसने दिलेल्या रिपोर्टनुसार, शाओमी, सॅमसंग, विवो, रियलमी आणि ओप्पो या पहिल्या पाच मोबाइल कंपन्यांनी गेल्या वर्षी याच काळात जितकी विक्री केली होती त्यापेक्षा अधिक विक्री यावेळी नोंदवण्यात आली आहे. 

कॅनलिसने एका निवेदनात म्हटलं आहे की, 2020च्या तिसऱ्या तिमाहीत देशात सर्मार्टफोन्सची विक्री आठ टक्क्यांवरुन वाढून पाच कोटी स्मार्टफोन्स इतकी झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत 4.62 कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली होती. हा आकडा देशातील एका तिमाहीतील स्मार्टफोन्सच्या विक्रीचा उच्च स्तर आहे.

शाओमी कंपनीने स्मार्टफोन विक्रीत 26.1 टक्के वाटा घेत अव्वल स्थानावर आहे. कंपनीने 1.31 कोटी फोन्सची विक्री केली आहे. सॅमसंगने विवोला मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. सॅमसंगने 1.02 कोटी फोन्सची विक्री करत बाजारातील 20.4 टक्के हिस्सा मिळवला आहे. 

यानंतर विवो कंपनीचा क्रमांक आहे. विवो कंपनीने 88 लाख स्मार्टफोन्सची विक्री करत बाजारातील 17.6 टक्के हिस्सा मिळवला आहे. रियलमी कंपनीने 17.4 टक्के वाटा मिळवत 87 लाख स्मार्टफन्सची विक्री केली आहे. तर ओप्पोने 61 लाख स्मार्टफोन्सची विक्री करत 12.1 टक्के वाटा मिळवला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी