Airtel Prepaid Plan Cost Hike : नवी दिल्ली : दर महिन्याला होणारा मोबाइल रिचार्जचा खर्च आणि टेलिकॉम कंपन्यांच्या प्रीपेड प्लॅनचे शुल्क हा सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. आता त्याच आघाडीवर एअरटेलच्या (Bharti Airtel) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने आपल्या मासिक प्रीपेड प्लॅनच्या (Airtel Prepaid Plans) शुल्कात मोठी वाढ केली आहे. एअरटेलने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या शुल्कात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 57 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशावर दर महिन्याच्या रीचार्जचा चांगलाच भार पडणार आहे. 28 दिवसांच्या रीचार्ज प्लॅनवर आता तुम्हाला 99 रुपयांऐवजी 155 रुपये द्यावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये 1 GB एकूण इंटरनेट, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएसची सुविधा उपलब्ध असेल. याआधी एअरटेलचा किमान रिचार्ज पॅक 99 रुपयांचा होता. त्यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 2.5 पैसे प्रति सेकंद दराने 200MB डेटा आणि कॉलिंगची सुविधा मिळत होती. (Airtel hikes charges of prepaid plans read in Marathi)
अधिक वाचा : डान्सरचा उत्साह पाहून काकांनाही आली हुक्की
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एअरटेलने नवीन रणनीतीची चाचपणी सुरू केली आहे. याचे परिणाम कसे येतात त्यानुसार ते संपूर्ण भारतात लागू केले जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर समोर आलेल्या माहितीनुसार एअरटेल 155 रुपयांच्या खाली एसएमएस आणि डेटासह सर्व 28 दिवसांचे कॉलिंग सुविधा रद्द करणार आहे. याचा परिणाम होत प्रीपेड प्लॅनच्या शुल्कात चांगलीच वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
अधिक वाचा : सरकारी नोकरीची कमाल, सावळा असूनही बायको मिळाली गोरी-गोमंटी
समोर आलेल्या माहितीनुसार 2021 मध्ये, कंपनीने निवडक सर्कलमध्ये आपले किमान रिचार्ज शुल्क 79 रुपयांवरून वाढवून 99 रुपयांपर्यंत नेले होते. एअरटेलच्या नवीन प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी कमी असणार आहे. 155 रुपयांच्या नवीन प्लॅनसह कंपनी आता 24 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग, 1GB डेटा आणि 300 SMS देणार आहे.
अधिक वाचा : गुणरत्न सदावर्ते भाजप समर्थक - भास्कर जाधव
समोर आलेल्या माहितीनुसार एअरटेलने आपले 109 रुपये आणि 111 रुपयांचे इतर किमान रिचार्ज प्लॅन देखील बंद केले आहेत. या प्लॅनची व्हॅलिडिटी 1 महिन्याची होती. देशात आता 5G सेवांची सुरूवात झाली आहे. मात्र याआधी काही महिन्यांपूर्वी संपलेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी टेलीकॉम कंपन्यांनी 1.5 लाख कोटी रुपयांची बोली लावली होती. आता या रकमेच्या वसूलीसाठी दूरसंचार कंपन्या लवकरच मोबाइल शुल्कात वाढ करण्याची चिन्हे आहेत.
देशातील दूरसंचार कंपन्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवनवीन प्रीपेड प्लॅन बाजारात आणत असतात. एअरटेल आणि जिओमध्ये तर जबरदस्त स्पर्धा सुरू आहे.आता प्रीपेड प्लॅनच्या शुल्कातील वाढ आणि ग्राहकांच्या द्यावयाच्या सुविधा या आघाडीवर या कंपन्या एकमेकांशी कशी स्पर्धा करतात आणि आपला महसूल कसा टिकवातात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.