जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लान, मिळणार ५० जीबी अनलिमिटेड डेटा

फोना-फोनी
Updated May 20, 2020 | 15:26 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Airtel launch plan: देशभरात लॉकडाऊन सुरू असतानाच रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी अनलिमिटेड डेटा प्लान लाँच केला.

smartphone
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा प्लान 

थोडं पण कामाचं

  • एअरटेलने २५२ रूपयांचा नवा प्लान लॉन्च केला आहे
  • एअरटेलने या प्लानमध्ये ५० जीबी अनलिमिटेड डेटा ऑफर केला आहे
  • नुकताच रिलायन्स जिओने आपल्या युजरसाठी डेटा वाऊचर प्लान लॉन्च केला होता

मुंबई : कोरोनासारख्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन असल्याने सगळेच घरात आहेत. लोकांची अनेक कामे ऑनलाईन होत आहेत. यासाठी इंटरनेट डेटाची मागणी वाढली आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी लोकांच्या सुविधेसाठी एकाहून एक प्लान लॉन्च करण्यास सुरूवात केली आहे. दूरसंचार कंपनी एअरटेलही या मैदानात उतरली आहे. खरंतर एअरटेलकडे याआधीचे डेटा प्लान आहेत. युजर्स घरात असल्याने व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीमिंग मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. ज्यामुळे डेटा लवकर संपतो. हे पाहता एअरटेलने आपल्या युजर्ससाठी २५१ रूपयांचे नवे डेटा वाऊचर आणले आहे. हे वाऊचर रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणले आहे. जिओ प्रमाणेच एअरटेलही या वाऊचरमध्ये ५० जीबी अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे.

एअरटेलने २५१ रूपयांत एक नवा प्लान लॉन्च केला आहे ज्यामध्ये ५० जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो. हे डेटा वाऊचर व्हॅलिडिटीसह येत नाही. जर युजर्सकडे मंथली प्लान आहे तर ५० जीबी वाऊचर त्या मासिक प्लानसोबतच संपेल. जर युजरकडे वार्षिक प्लान आहे तर युजर डेटाच्या आवश्यकतेनुसार संपूर्ण वर्षभर ५० जीबीचा वापर करू शकतो.

रिलायन्स जिओचा हा आहे डेटा वाऊचर प्लान

नुकताच रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी डेटा वाऊचर प्लान लॉन्च केला होता. जिओने १५१ रूपये, २०१ रूपये आणि २५१ रुपयांचे तीन नवे पॅक लॉन्च केले होते. १५१ रूपयांच्या प्लानमद्ये ३० दिवसांसाठी ३० जीबी डेटा पॅक मिळतो. २०१ रूपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांसाठी ४० जीबी डेटा आणि २५१ रूपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांसाठी ५० जीबी डेटा मिळतो.

एअरटेलचा वार्षिक प्रीपेड प्लान

एअरटेलने जिओला टक्कर देण्यासाठी २४९८ रूपयांचा नवा वार्षिक प्रीपेड प्लान आणला आहे. यात ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी असून दिवसाला युजरला २ जीबी डेटा मिळेल. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची सोय आहे. याशिवाय युजरला वर्षाचे झी५चे सबस्क्रिप्शन फ्री मिळेल, एअरटेल सिक्युर मोबाईल सिक्युरिटी अँटी वायरस सॉल्युशन, एअरटेल एक्स्ट्रीम प्रीमियम सबस्क्रिप्शन, Wynk म्युझिक प्रीपेड सबस्क्रिप्शन, फ्री हॅलो ट्यून्स आणि  FASTag वर१५०चा कॅशबॅकची ऑफर आहे.

९८ रूपयांचा छोटा डेटा वाऊचर

एअरटेलने काही युजर्ससाठी ९८ रूपयांचा छोटा डेटा वाऊचर पॅक आणला आहे. ज्यांच्याकडे लाँग टर्म प्लान नाही त्यांच्यासाठी हा प्लान आहे. ९८ रूपयांचा हा प्लान २५१ रूपयांच्या प्लान इतकाच आहे केवळ १२ जीबी एक्स्ट्रा डेटा मिळतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी