जिओनंतर आता एअरटेलने आणले फुल ऑन एंटरटेनमेंटवाले ३ प्लॅन, पाहा फायदे

एअरटेलने कोणतीही किंमत न वाढवता ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी सेवा सुरू करण्यासाठी आपल्या पोस्टपेड प्लॅनला अपडेट केले आहे. या प्लॅनसोबत डिस्ने+हॉटस्टारचा व्हीआयपी सबस्क्रिप्शन मोफत मिळते.

Airtel prepaid plan
एअरटेलचे नवे प्रीपेड प्लॅन 

थोडं पण कामाचं

  • एअरटेलने लॉंच केले ३ धमाकेदार प्लॅन
  • जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचे नवे प्लॅन, प्लॅनबरोबर मिळणार Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल
  • एक वर्षाच्या डिस्ने+हॉटस्टार मोबाइल (Disney+ Hotstar Mobile)सबस्क्रिप्शनसह ४९९ रुपयांपासून ते २,७९८ रुपयांपर्यतचे अपडेटेड प्रीपेड प्लॅन

नवी दिल्ली: जिओबरोबरच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एअरटेलने (Airtel)धमाकेदार प्लॅन बाजारात आणले आहेत. एक वर्षाच्या डिस्ने+हॉटस्टार मोबाइल (Disney+ Hotstar Mobile)सबस्क्रिप्शनचा समावेश करण्यासाठी एअरटेल प्रीपेड रिचार्ज प्लॅनला रिव्हाईस केले आहे. अपडेटेड प्रीपेड प्लॅन ४९९ रुपयांपासून ते २,७९८ रुपयापर्यत आहेत. या प्लॅनसोबत डिस्ने+हॉटस्टारचा व्हीआयपी सबस्क्रिप्शन मोफत मिळते. एअरटेलने कोणतीही किंमत न वाढवता ओव्हर द टॉप म्हणजे ओटीटी सेवा सुरू करण्यासाठी आपल्या पोस्टपेड प्लॅनला अपडेट केले आहे. याआधी जिओ आणि व्होडाफोन यांनी देखील डिस्ने+हॉटस्टार मोबाईलसोबत आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये सुधारणा केली आहे. (Airtel Prepaid Plan : Airtel launches 3 prepaid plans to counter Reliance Jio)

डिस्ने+हॉटस्टार मोबाईलसोबत एअरटेल प्रीपेड रीचार्ज प्लॅन

एअरटेलचा ४९९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या ४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने+हॉटस्टार सेवा मिळते आहे. तुम्हाला यात एक वर्षाचे सब्सक्रिप्शन मिळेल. याची व्हॅलिडिटी २८ दिवस आहे आणि दररोज ३ जीबी डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. याआधी हाच प्लॅन ४४८ रुपयांचा होता, मात्र तो आता उपलब्ध असणार नाही.

एअरटेलचा ६९९ रुपयांचा प्लॅन

४९९ रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त एअरटेलने ६९९ रुपयांचा प्लॅनदेखील सादर केला आहे. या व्हॅलिडिटी ५६ दिवसांची आहे आणि या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल. शिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये तेच लाभ मिळतील जे आधी ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळत होते.

एअरटेलचा २,७९८ रुपयांचा प्लॅन

कंपनीने २,७९८ रुपयांचा प्लॅन बाजारात आणला आहे. याची व्हॅलिडिटी ३६५ दिवस असणार आहे. यामध्ये एक वर्षाचा डिस्ने+हॉटस्टार मोबाइलचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. शिवाय दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. एअरटेलच्या जन्या २,६९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये हेच बेनिफिट्स मिळत होते, ते आता बंद करण्यात आले आहेत.

जिओनेदेखील डिस्ने+हॉटस्टार एक वर्षांसाठी सब्सक्रिप्शन प्लॅन लॉंच केले आहेत. या प्लॅनची सुरूवात ४९९ रुपयांपासून होते. व्होडाफोन-आयडियाने याआधीच असे प्लॅन लॉंच केले आहेत. या प्लॅनची सुरूवात ५०१ रुपये आहे.

रिलायन्स जिओ आणि एअरटेलमधील स्पर्धा अतिशय तीव्र झाली आहे. त्यातच व्होडाफोन आयडियावरील थकित कर्ज वाढल्यामुळे आणि कंपनीची आर्थिक स्थिती गंभीर असल्यामुळे भविष्यात दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओ आणि एअरटेलमधील स्पर्धा वाढणार आहे. त्यामुळेच जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सातत्याने नवे प्लॅन आणत असते. त्याचबरोबर व्होडाफोन आयडियाचे जास्तीत जास्त ग्राहक आपल्याकडे वळवण्यासाठी रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आधीच्याच प्लॅनना रिव्हाइज करून त्यात अतिरिक्त सुविधा देत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न या कंपन्यांकडून केला जातो. भविष्यातदेखील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा लक्षात घेता एअरटेल आणि जिओकडून नवे प्लॅन बाजारात आणले जाऊ शकतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी