एअरटेलच्या 'या' रिचार्जवर ग्राहकांना होणार तब्बल चार लाखांचा फायदा

Airtel Recharge: एअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर दिली आहे. जाणून घ्या काय आहे ही ऑफर आणि किती होणार याचा फायदा.

airtel prepaid recharge get 4 lakh rupees insurance cover offer with 599 rupees plan technology news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: IANS

थोडं पण कामाचं

  • एअरटेलची ग्राहकांना जबरदस्त ऑफर
  • 599 रुपयांच्या रिचार्जवर होणार लाखोंचा फायदा 
  • सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा
  • आणि मिळवा 4 लाखांचा विमा

नवी दिल्ली: भारती एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. प्रीपेड ग्राहकांनी 599 रुपयांच्या रिचार्ज केल्यास चार लाखांचा विमा मिळणार आहे. यासाठी भारती एक्सा आणि एअरटेल यांनी एक करार सुद्धा केला आहे. मात्र भारती एअरटेलची ही ऑफर काही ठराविक राज्यांतील प्रीपेड ग्राहकांसाठीच असणार आहे.

भारती एअरटेलने सोमवारी आपल्या 599 रुपयांच्या नव्या प्रीपेड प्लानची घोषणा केली. या प्लानमध्ये ग्राहकांना प्रति दिवस 2GB डेटा, कुठल्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS फ्री यांसारख्या सुविधा आहेत. तसेच भारती एक्सा लाइफ इंश्युरन्सकडून तब्बल चार लाखांचा विमा देण्यात येणार आहे. 

दोन्ही कंपन्यांनी एकत्रित म्हटलं आहे की, एअरटेलच्या 599 रुपयांच्या या रिचार्जची वैधता 84 दिवस असणार आहे. प्रत्येक रिचार्जसोबत तीन महिन्यांचा विमा ग्राहकांना मिळणार आहे. 18 ते 54 वर्षांपर्यंतच्या सर्व ग्राहकांना विमाची ही सुविधा मिळणार आहे. यासाठी कागदपत्रे तसेच शारीरिक तपासणीची आवश्यकता असणार नाहीये. या विम्याचं प्रमाणपत्र डिडिटल स्वरूपात तात्काळ वितरीत करण्यात येणार आहे.

कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, ग्राहकांनी मागणी केल्यास त्यांच्या घरी विमा पॉलिसीची प्रत पाठवली जाईल. या विमा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी पहिलं रिचार्ज केल्यानंतर एसएमएस, एअरटेल थँक्स अॅप किंवा एअरटेल रिटेलरच्या माध्यमातून आपल्या कवरसाठी अर्ज करावा लागणार आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एअरटेलने ही सेवा दिल्लीसोबत काही ठराविक राज्यांत सुरु केली आहे आणि नंतर ही सेवा संपूर्ण देशभरात सुरु करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी