Airtel Recharge: एअरटेलचा आकर्षक प्लान, दररोज मिळणार एक्स्ट्रा डेटा

फोना-फोनी
Updated May 21, 2019 | 22:24 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Airtel: एअरटेलने आपल्या तीन प्रीपेड प्लान्समध्ये महत्वाचे बदल केले आहेत. यामुळे सर्व अॅक्टिव यूजर्सना एक्स्ट्रा डेटा मिळत आहे. जाणून घ्या या नविन प्लान्सचे लाभ काय आहेत.

Airtel new plans
एअरटेलचा नवा आकर्षक प्लान 

मुंबईः टेलिकॉम ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये नेहमीच स्पर्धा चालू असते आणि याच स्पर्धेत आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी नवनविन स्कीम्स, प्लान्स कंपन्या लॉन्च करत असतात. आता एअरटेल आपल्या तीन प्रीपेड प्लान्समध्ये बदल करत ग्राहकांना अधिकचा डेटा प्रदान करत आहे. एअरटेलच्या 399 रूपये, 448 रूपये आणि 499 रुपये प्सान्सच्या युजर्सला 400 MB अतिरिक्त डेटा प्रति दिवस देण्याचे ठरवलं आहे. यामुळे नव्या प्लाननुसार अनुक्रमे 1.4GB, 1.9GB आणि 2.4GB चा डेटा ग्राहकांना दररोज मिळणार आहे. याआधी एअरटेलने 129 रूपये आणि 249 रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले होते. ज्यामध्ये यूजर्सला 4 लाख रुपयांचा लाईफ इंश्युरन्स मिळत होता.  

एअरटेलच्या 499 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2.4GB डेटा मिळणार आहे. यापूर्वी या प्लानमध्ये ग्राहकांना 2GB डेटा दररोज मिळत होता. अधिकच्या डेटा व्यतिरिक्त ग्राहकाला मोफत एअरटेल प्रिमियमचाही लाभ मिळत आहे. एअरटेल प्रिमियमच्या माध्यामातून 4G मोबाईल डिवाइस कॅशबॅकचाही लाभ ग्राहकाला मिळत आहे. ग्राहकांना नवा 4G फोन खरेदीवर 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळत आहे. तसेच नॉर्टन मोबाइल सिक्युरिटीचे एक वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन, विंक म्युझिकचे सब्सक्रिप्शन मिळणार आहे. या प्लानची वैधता 82 दिवसांची असून अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS फ्री देण्यात येत आहेत.

तसेच एअरटेलच्या 448 रुपये प्लानच्या यूजर्सना आधी 1.5GB डेटाच्या बदल्यात आता दररोज 1.9 GB डेटा मिळेल. त्याचबरोबर युजरला एअरटेल टीव्ही प्रिमियमचे सब्सक्रिप्शन, एक वर्षासाठी नॉर्टन मोबाईल सिक्युरिटीचं सब्सक्रिप्शन, विंक म्युजिकचे सब्सक्रिप्शन आणि कॅशबॅकचा लाभही मिळेल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS फ्री देण्यात येत आहेत. या प्लानची वैधता 82 दिवसांची असणार आहे. 

399 रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला दररोज 1.4GB डेटा मिळेल. यापूर्वी 399 रुपये प्लान्सच्या युजर्सला 1GB डेटा मिळत असे. या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, या प्लानमध्येही ते सगळे लाभ मिळतील जे 499 रुपये आणि 448 रुपयांच्या युजर्सला मिळत आहेत. या सर्व प्लान्समधील बदल आपल्याला एअरटेलच्या वेबसाईटवर सध्या पहायला मिळत नाहीयेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Airtel Recharge: एअरटेलचा आकर्षक प्लान, दररोज मिळणार एक्स्ट्रा डेटा Description: Airtel: एअरटेलने आपल्या तीन प्रीपेड प्लान्समध्ये महत्वाचे बदल केले आहेत. यामुळे सर्व अॅक्टिव यूजर्सना एक्स्ट्रा डेटा मिळत आहे. जाणून घ्या या नविन प्लान्सचे लाभ काय आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola