Airtel: एअरटेल प्रीपेड यूजर्सना मिळणार 6 जीबी डेटा Free, ऑफर्स मिळवण्यासाठी 'या' आहेत अटी

फोना-फोनी
Updated Jul 26, 2020 | 16:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारती एअरटेलने भारतात आपल्या प्रीपेड सबस्क्राईबर्ससाठी मोफत डेटा कुपन लॉन्च केले आहे. कंपनीकडून निवडक ग्राहकांनाच याचा लाभ मिळणार आहे.

New plans by Airtel Bharati
भारती एअरटेलचे नवे प्लॅन्स 

थोडं पण कामाचं

  • निवडक ग्राहकांना प्लॅननुसार मिळणार ठराविक मोफत डेटाचा लाभ
  • प्रीपेड प्लॅनच्या किंमतीनुसार मिळणार 2, 4 आणि 6 मोफत डेटा कुपन्स
  • एसएमएसद्वारे मिळणार रोजच्या विजेत्यांना ऑफरचा लाभ मिळाल्याची माहिती

Airtel: भारती एअरटेलने (Bharti Airtel) भारतात आपल्या प्रीपेड सबस्क्राईबर्ससाठी मोफत डेटा कुपन लॉन्च केले आहे. कंपनीकडून निवडक ग्राहकांनाच याचा लाभ मिळेल. त्यांना 219 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर याचा लाभ मिळेल. एअरटेल थँक्स अॅपद्वारे ग्राहक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील सर्व अटी भारती एअरटेलच्या अधिकृत साइटवर उपलब्ध आहे. अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, प्री-सिलेक्टेड यूजर्सना मोफत डेटा कुपन्स उपलब्ध करून देण्यात येतील. याची यादी एअरटेल थँक्स अॅपवर माय कुपन्स ऑप्शनखाली जाहीर करण्यात येईल.

219 रुपये, 279 रुपये, 298 रुपये, 349 रुपये किंवा 398 रुपयांचा प्रीपेड प्लॅन घेतलेल्या एअरटेल सबस्क्रायबर्सला 1 GB डेटाचे दोन कुपन्स देण्यात येतील आणि याची प्रत्येकी व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असणार आहे.

399 रुपये, 449 रुपये आणि 558 रुपयांचा प्रीपेड प्लॅन घेतलेल्या ग्राहकांना 1 GB डेटाचे चार कुपन्स देण्यात येतील आणि यांची प्रत्येकी व्हॅलिडिटी 56 दिवसांची असेल. याशिवाय 598 रुपये आणि 698 रुपयांचा प्रीपेड प्लॅन घेतलेल्या एअरटेल सबस्क्रायबर्सला 1 जीबी डेटाचे सहा कुपन्स देण्यात येतील आणि यांची प्रत्येकी व्हॅलिडिटी 84 दिवसांची असेल. 

पात्रतेनुसार ज्या यूजर्सना एअरटेलकडून निवडण्यात येईल त्यांनाच या ऑफर्सचा फायदा मिळेल. रोजच्या विजेत्यांची कमाल संख्या ठरलेली नसली तरी एकावेळी एकच व्यक्ती एकदाच जिंकू शकते, तिला दुसऱ्यांदा निवडण्यात येणार नाही. ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी नियम आणि अटी वाचून घ्या. यूजर्सना ते जिंकल्याची माहिती एसएमएसद्वारे देण्यात येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी